Seed Bill 2025 : कृषी मंत्रालयाने नवीन बियाणे विधेयकाचा मसुदा केला जारी; ११ डिसेंबरपर्यंत सूचना पाठवता येणार
Seed Bill 2025 : केंद्रीय कृषी मंत्रालयाने गुरुवारी (ता.१४) नवीन बियाणे कायद्याचा मसुदा सार्वजनिक सल्लामसलतीसाठी जारी केला आहे. या मसुद्यावर ११ डिसेंबरपर्यंत सर्व भागधारकांकडून सूचना आणि टिपणी मागवण्यात आल्या आहेत. २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन बियाणे विधेयक संसदेत मांडण्यात येण्याची शक्यता आहे.