Dhananjay Munde : बियाणे आणि खतांच्या तुटवड्यावर कृषीमंत्र्यांचे वक्तव्य; नफेखोरांविरोधात कारवाईचे निर्देश

Seeds and Fertilizers Crisis : राज्यात बनावट बी-बियाणे आणि खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. तसेच त्यांची विक्री चढ्या दराने केली जात आहे. त्यावरून विरोधकांसह शेतकऱ्यांमधून राग व्यक्त होत आहे.
Dhananjay munde
Dhananjay mundeAgrowon

Pune News : राज्यात बी-बियाणे, खते, बियाणांची चढ्या दराने विक्री होत असून शेतकऱ्यांची लूट होत आहे. त्यावरून विरोधकांसह शेतकऱ्यांनी सरकारवर टीका केली होती. मात्र कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून कोणतीच भूमिका स्पष्ट झाली नव्हती. त्यावरून मुंडे यांच्यावर देखील मधल्या काळात टीका झाली. त्यानंतर आता मुंडे यांनी बियाणे आणि खतांच्या तुटवड्यावर वक्तव्य केले आहे. काही घटकांकडून जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण केला जात असल्याचे मुंडे म्हणाले. तसेच मुंडे यांनी याप्रकरणी कृषी विभागाला कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले असून सरकारने गंभीर दखल घेतल्याचे म्हटले आहे. तर असे कृत्य खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा मुंडे यांनी शुक्रवारी (ता.१४) बीड येथे पत्रकार परिषदेत दिला. शुक्रवारी मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील महावितरणचे प्रलंबित कामे, पावसाळ्याचे नियोजन, विविध योजनाबाबत आढावा बैठक घेतली.

या बैठकीला आमदार प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब काका आजबे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलिस अधीकक्षक नंदकुमार ठाकून, महावितरणचे अधीक्षक अभियंता भूमे यांच्याबरोबर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Dhananjay munde
Dhananjay Munde : कृषीमंत्र्यांनी घेतला खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा; अधिकाऱ्यांचे कानही टोचले

राज्यात यंदा मॉन्सूनची दमदार सुरूवात झाली आहे. तसेच खरीप हंगामात देखील समाधानकारक पाऊस असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे बी-बियाणे, खते, कीटकनाशके इ. कृषी निविष्ठा शासन आणि बाजार स्तरावर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर राज्यात कुठेही बी-बियाणे, खते, बियाणांची कमतरता भासू देणार नसल्याचे मुंडे म्हणाले.

राज्यात बनावट बी-बियाणे, खते, बियाणांची चढ्या दराने विक्री असल्याबाबत मुंडे यांनी याबाबत मौन सोडले आहे. तर बनावट बियाणांचा शेतकऱ्यांना त्रास होत असल्याचे मुंडे म्हणाले. तर ५ कृषी कायद्यांचा प्रस्ताव आल्यानंतर खते आणि बियाणांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काही लोक नफेखोरीचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व जाणीवपूर्वक केले जात असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. अशी कारवाई खपवून घेतली जाणार नाही, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर (९८२२६६४४५५) आतापर्यंत १५३ तक्रारी प्राप्त आहेत. त्यापैकी ७५ तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. खतांची-बियाणांची कृत्रिम टंचाई आणि आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाकडून धडक कारवाया सुरू आहेत. तर असे प्रकार रोखण्यासाठी शासन स्तरावर टास्क फोर्स नेमून सुयोग्य नियोजन करण्यात येत असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे. यंदाच्या खरीप हंगामात महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी कृषी निविष्ठा सरकारी आणि बाजार स्तरावर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जात आहेत, अशी माहिती मुंडे यांनी दिली.

Dhananjay munde
Dhananjay Munde : बियाणे आणि खते विक्रेत्यांच्या मनमानी कारभाराला ब्रेक? कृषीमंत्र्यांनी जारी केला हेल्पलाइन क्रमांक

पराभवाची जबाबदारी घेतली

दरम्यान मुंडे यांनी काही राजकीय प्रश्नांना उत्तरे ही दिली. त्यावेळी पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर देखील मुंडे यांनी भाष्य केले. मुंडे म्हणाले, बीड लोकसभा निवडणूक आम्ही विकासाव्यतिरिक्त इतर मुद्द्यांवर लढली गेली. फार कमी मतांच्यास फरकाने आम्ही हरलो. आम्ही पराभवाची जबाबदारी घेत असून निवडणुकीत जय-पराजय असतो. त्यामुळे ही शेवटची निवडणूक नसून कार्यकर्त्यांनी पुढच्या लढाईसाठी सज्ज रहावे असे मुंडे यांनी म्हटले आहे.

राज्यात खरीप हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांनी बी-बियाणांसाठी फिरण्याची वेळ आली. कापूस बियाणांसाठी अकोल्यात शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केले. तर बियाणांसाठी लांबच लांब रांगेत उभे राहील्यानंतर हातात फक्त दोनच पाकिटं दिली जात होतं. तर ठरलेल्या किमतीपेक्षा जादा दराने बियाणे विक्री जात असल्याच्या तक्रारीही अनेक ठिकाणाहून प्राप्त येत होत्या. त्यावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील थेट कृषीमंत्र्यांवर टीका केली होती. त्यानंतर आता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून खतांची-बियाणांची कृत्रिम टंचाई आणि चढ्या दराने विक्रीबाबत भाष्य समोर आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com