Nanded News: पाणी फाउंडेशन आयोजित गटशेती प्रीमियर लीग (GPL) २०२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोहा तालुक्यातील शेतकरी गटांचा सन्मान सोहळा नुकताच उत्साहात झाला. तालुक्यातील विविध गटांनी सुधारित शेती पद्धती, तांत्रिक अवलंब आणि सामूहिक कृतीद्वारे केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यामुळे आगामी फार्मर कप २०२६ साठी तालुक्यात नवी ऊर्जा निर्माण झाली आहे..कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत प्रमुख उपस्थित होते. ‘‘गटशेतीच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याची वेळ आली आहे. कृषी विभाग सर्व गटांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. त्यांनी शेतकऱ्यांनी शास्त्रीय शेती, हवामानानुकूल तंत्रज्ञान, शेतीशाळा आणि पाणी फाउंडेशनच्या निवासी प्रशिक्षणाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, .Farmer Cup Training: अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फार्मर कपचे प्रशिक्षण.नांदेड जिल्ह्यातील पानी फाउंडेशनच्या कार्याचा खरा पाया म्हणजे लोहा तालुका पुढील वर्षी फार्मर कप जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत जाईल, मात्र मार्गदर्शक भूमिका बजावणारा तालुका म्हणून लोहा जिल्ह्यात ठळकपणे ओळखला जाईल.’’ असे कळसाईत म्हणाले..Farmer Cup: ‘फार्मर कप’द्वारे १५ हजार शेतकरी गट होणार: मुख्यमंत्री.सह्याद्री फॉर्मचे कैलास सावंत यांनी आधुनिक व सुधारित शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. राजाभाऊ जाधव आणि उमेद जिल्हा व्यवस्थापक जंगलवाड यांनी विषमुक्त शेती व शेतीपूरक व्यवसाय यावर माहिती दिली. बीआरएलएफचे दिनेश खडसे यांनी सेंद्रिय शेतीसोबतच नव्या कृषी उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. मान्यवरांचे स्वागत पानी फाउंडेशनचे नांदेड विभागीय समन्वयक प्रवीण काथवटे यांनी केले. सन्मान सोहळ्यानंतर शेतकरी गटांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले..जीपीएल २०२५ मधील यशामुळे गटशेतीचे नव्या पर्व सुरू झाले असून फार्मर कप २०२६ साठी लोहा तालुक्यात तयारी, आत्मविश्वास आणि स्पर्धेचा उत्साह वाढल्याचे शेतकऱ्यांनी व्यक्त केले.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.