Agri Department Corruption: कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या नातलगांच्या नावावर होणाऱ्या कृषी निविष्ठा विक्रीच्या ‘दुकानदारीला’ चाप लावत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पदाचा गैरवापर करून सूक्ष्म सिंचन संच शेतकऱ्यांना सक्तीने खरेदीस भाग पाडणाऱ्या प्रकरणात हिंगणा येथील उपकृषी अधिकारी शुभांगी खैरे (गावंडे) यांच्या पतीच्या नावे असलेल्या सूक्ष्म सिंचन विक्री संदर्भातील नोंदणी थेट रद्द करण्यात आली आहे..हिंगणा तालुक्यातील आर्वी येथे मंगेश खैरे यांच्या नावे ‘मेसर्स श्री साई ॲग्रो सर्व्हिसेस’ हे कृषी सेवा केंद्र कार्यरत होते. या केंद्रामार्फत सूक्ष्म सिंचन संचांची विक्री केली जात होती. मात्र, संबंधित उपकृषी अधिकाऱ्यांच्या पदाचा वापर करून शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या..Agriculture Department Action: कृषी विभागाची कारवाई केवळ देखाव्यासाठी ?.या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी २०२५-२६ या वर्षासाठी संबंधित फर्मची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर पुढील वर्षीही या फर्मला नव्याने नोंदणी देऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत..Agriculture Department Reform: भाकड काळ संपेल?.कृषी आयुक्तालयाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेतली असून राज्यभरातील संशयित प्रकरणांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे..सिंचन सेवा देणारे तीन ते चार वितरक या भागात आहेत. मात्र काहींनी या व्यावसायिकाविषयी तक्रार केली होती. त्या आधारे वरिष्ठांमार्फत ही कारवाई करण्यात आली.शिवाजी सरनाईक, तालुका कृषी अधिकारी, हिंगणा, नागपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.