MahaDBT Subsidy : महाडीबीटीच्या यंत्र वा अवजारांची खरेदी देयक ३० दिवसांनंतरही अपलोड करता येणार; कृषी विभागाने केली अट शिथिल
MahaDBT Scheme: कृषी विभागाने महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवरील कृषी यांत्रिकीकरण लाभार्थींना पूर्वसंमती मिळाल्यानंतर देयक अपलोड करण्यासाठी ३० दिवसांच्या मुदतीची अट शिथिल केली आहे. त्यामुळे आता महाडीबीटीच्या अंतर्गत निवड झालेली शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाल्यानंतर ३० दिवसांनंतरही देयक अपलोड करता येणार आहे.