Agriculture Industry Issue : उत्तर महाराष्ट्रातील कृषी, पूरक उद्योग अडचणीत

Mumbai Highway Condition : मुंबई महामार्गाला मोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाल्याने शेतकऱ्यांसह शेतीमाल व्यापारी व निर्यातदार अडचणीत सापडले आहेत.
Mumbai Highway Condition
Mumbai Highway ConditionAgrowon
Published on
Updated on

Nashik News : नाशिकला मुंबईची ‘परसबाग’ म्हटले जाते. येथून दररोज शेकडो वाहनांतून भाजीपाला जातो. मात्र मुंबई महामार्गाला मोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाल्याने शेतकऱ्यांसह शेतीमाल व्यापारी व निर्यातदार अडचणीत सापडले आहेत. भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ, कुक्कुट पक्षी व अंडी असा नाशवंत माल वेळेवर पोहोचत नाही. एरवी ५ ते ६ तास लागतात. मात्र आता वाहतूक कोलमडल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

नाशिक ओलांडल्यानंतर घोटी-इगतपुरीपासूनच कसारा घाट, शहापूर, पडघा, कल्याण, ठाण्यापर्यंत मुंबईच्या वेशीवर रस्त्यांची चाळण झाली आहे. परिणामी, शेतीमाल वाहतूक समस्या गंभीर झाली असून प्रवाशीही त्रस्त आहेत. शेतकरी, भाजीपाला व्यापारी, शेतीमाल निर्यातदार मेटाकुटीला आले आहेत.

Mumbai Highway Condition
Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ला माझाही विरोध; महामार्ग होऊ देणार नाही : अजित पवार

सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी जुलैअखेर बैठक घेत आठ दिवसांत प्रश्‍न सोडविण्याच्या सूचना दिल्या. मात्र त्याचा काहीही परिणाम दिसून आलेला नाही. मुंबई-नाशिक मार्गावर खड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. भाजीपाला, दूध, ब्रॉयलर कुक्कुट पक्षी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मुंबई ते नाशिक अंतर कापण्यासाठी दुपटीहून अधिक वेळ लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कधी सुटणार की मंत्र्यांच्या आढावा बैठका फक्त नावालाच उरणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Mumbai Highway Condition
Highway Projects : महामार्ग प्रकल्पांचा भार पेलवेना

...असा बसतोय फटका

खड्ड्यामध्ये जनित्र चालत नसल्याने वातानुकूलित वाहन असूनही शीतसाखळी कामकाज अडचणीत

भाजीपाला वेळेवर पुरवठा होण्यास अडचणी; परिणामी भाजीपाल्याच्या प्रतवारीवर परिणाम व दरात फटका

मोठ्या खड्ड्यांमध्ये अंडी वाहतूक करणारे वाहन आदळून अंड्यांचे २५ टक्के नुकसान

ताजा भाजीपाला वेळेवर पोहचत नसल्याने कामकाज ठप्प, परिणामी निर्यातक्षम माल स्थानिक बाजारात बेभाव विकण्याची वेळ

कुक्कुटपालनाला फटका

नाशिकला वाहने वेळेवर पोहचत नसल्याने पर्यायी मिरज, कोल्हापूर यासह थेट बेळगाव येथून ब्रॉयलर कोंबड्यांची खरेदी होत आहे. मात्र वाहतूक कोंडीमुळे व्यापारी नाशिकला येत नाहीत. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाचे हब झालेल्या नाशिकला मोठा आर्थिक फटका बसत आहे.

आमच्या उद्योगामार्फत हॅचिंगसाठी अंडी विमानाने निर्यात केली जाणार होती. मात्र वेळेवर मुंबईपर्यंत माल पोहोचण्यासाठी लागणारा वेळ, त्यामुळे होणारे नुकसान यामुळे निर्यातीचे कामकाज पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली आहे.
श्रीकृष्ण गांगुर्डे, संचालक, एव्ही ब्रॉयलर्स, सोग्रस, जि. नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com