Chandrapur News: अचूक आधुनिक शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती अधिक उत्पादनक्षम व किफायतशीर करण्याचा प्रयत्न आनंदवन कृषी तंत्र विद्यालयाचा माजी विद्यार्थी सूरज कुंभारे करीत आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या सूरज कुंभारे यांनी ड्रोन आधारित कृषी सेवांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतात उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले आहे..वरोरा तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी असलेल्या सूरज कुंभारे यांनी आनंदवन कृषी तंत्र विद्यालयातून दोन वर्षांची कृषी पदविका पूर्ण केल्यानंतर उद्योजकतेतील विविध प्रयोग केले. या प्रवासातच त्यांना ड्रोन तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली येथून व्यावसायिक ड्रोन प्रशिक्षण घेतले असून ते परवाना प्राप्त ड्रोन पायलट व ड्रोन प्रशिक्षक आहेत..Agriculture Training : शेतकऱ्यांचे ब्रॅण्ड टिकविण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे .सध्या वरोरा येथे स्वतःचे ड्रोन प्रशिक्षण व कृषी सेवा केंद्र यशस्वीपणे चालवत असून शेतीसाठी उपयुक्त अशा ड्रोन सेवांद्वारे अल्पदरात ड्रोन फवारणी, पीक निरीक्षण तसेच तांत्रिक मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले जात आहे. .Agriculture Training : केव्हीकेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण.ड्रोनच्या वापरामुळे औषधांची अचूक फवारणी होत असून मजुरीचा खर्च कमी होण्यासोबतच वेळेची बचत व उत्पादनवाढीस मदत होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सूरज कुंभारे यांना आनंदवन कृषी विद्यालयाच्या प्राचार्या हर्षदा पोतदार यांच्या मार्गदर्शनामुळे कृषी-उद्योजकतेत पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात ड्रोनचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले..या वेळी प्राचार्य डॉ. पोतदार यांनी अचूक शेतीचे महत्त्व विशद करत ड्रोन व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शेती अधिक उत्पादनक्षम व किफायतशीर कशी होऊ शकते, यावर भर दिला.या कार्यक्रमात उपविभागीय कृषी अधिकारी (वरोरा) कविता हिरणखेडे यांनी ड्रोनसंबंधित शासकीय योजना, अनुदान, प्रशिक्षण तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.