Agriculture Exhibition : श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे कृषी प्रदर्शन २७ डिसेंबरपासून

Sharad Pawar : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि खासदार शरद पवार यांना संस्थेच्या वतीने पहिल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Agricultural Exhibition
Agricultural ExhibitionAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जंयतीनिमित्त (शतकोत्तर रौप्य महोत्सव) श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३० डिसेंबर दरम्यान अमरावती येथे कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि खासदार शरद पवार यांना संस्थेच्या वतीने पहिल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हर्षवर्धन देशमुख म्हणाले ती, देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील कृषी प्रदर्शन हा एक भाग आहे.

कृषी प्रदर्शनाचे उद्‍घाटन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता करण्यात येईल. त्यानंतर दुपारी दोन वाजता शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या मुख्य समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

Agricultural Exhibition
Agrowon Exhibition : छत्रपती संभाजीनगरला ‘अॅग्रोवन’चे ११ जानेवारीपासून भव्य कृषी प्रदर्शन

समारंभात केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहतील. कार्यक्रमात शरद पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. याशिवाय भारत सरकारने भाऊसाहेबांचे छायाचित्र असलेले नाणे प्रसिद्ध केले असून या कार्यक्रमात ते प्रसिद्ध केले जाईल.

Agricultural Exhibition
Agriculture Exhibition : ‘पंदेकृवि’त २७ डिसेंबरपासून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

तसेच, भाऊसाहेबांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात जो शोध प्रबंध सादर केला, त्याला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने त्यावर आधारित १२९ व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रातून एका स्वतंत्र ग्रंथाती निर्मिती करण्यात आली. या वेळी त्याचेही प्रकाशन करण्यात येईल, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेमध्ये कार्यकारिणी सदस्य हेमत काळमेघ, बबनराव चौधरी, प्राचार्य डॉ. महेंद्र ढोरे, प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख उपस्थित होते.

असे असेल कृषी प्रदर्शन

यंदाचे कृषी प्रदर्शन हे आगळेवेगळे असणार असून त्यामध्ये शेती कशी करावी याचे लाईव्ह प्रदर्शन करण्यात येईल. यासाठी ग्रीनहाऊस, पॉलिहाऊस, शेटनेट यामध्ये फळे, फुले, भाजीपाला कसा घ्यावा याचे लाईव्ह प्रात्यक्षिक देण्यात येईल. तसेच फळ, भरड धान्य, दुग्धविकास, खतनिर्मिती आणि इतर विविध कृषी संबंधित उत्पादने

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com