Justice For Sonawane: कृषी सहायक आत्महत्या प्रकरण: न्यायासाठी संघटनेचे आंदोलन

Black Ribbon Movement: सिल्लोड येथील कृषी सहायक योगेश सोनवणे यांच्या आत्महत्याप्रकरणी तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी करीत कृषी सहायक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. सोमवारी (ता. २४) राज्यातील कृषी सहायक हे काळ्याफिती लावून असहकार आंदोलन करणार आहेत.
Agricultural Assistant Yogesh Sonawane
Agricultural Assistant Yogesh SonawaneAgrowon
Published on
Updated on

Akola News: सिल्लोड येथील कृषी सहायक योगेश सोनवणे यांच्या आत्महत्याप्रकरणी तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी करीत कृषी सहायक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. सोमवारी (ता. २४) राज्यातील कृषी सहायक हे काळ्याफिती लावून असहकार आंदोलन करणार आहेत. शिवाय न्याय मिळण्यासाठी वेळप्रसंगी उपोषणाचा इशाराही कृषी आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात देण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष विलास रिंढे यांनी दिली.

याबाबत संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गुरुवारी (ता.२०) सिल्लोड (जि. संभाजीनगर) तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत कृषी सहायक योगेश शिवराम सोनवणे यांनी सकाळी ८ ते ९च्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली. त्यांनी कार्यालय प्रमुख व कार्यालयातील इतर काही कर्मचाऱ्यांच्या मानसिक व आर्थिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

Agricultural Assistant Yogesh Sonawane
Agriculture Officer Suicide: कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहायकाची आत्महत्या

त्याबाबत सोनवणे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा संघटनेच्या व्हॉट्‌सअॅप ग्रुपवर तसे मेसेज केल्याचे स्क्रीन शॉटही समोर आले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांसोबत चर्चा केली असता, सोनवणे यांना तालुका कृषी अधिकारी बरधे यांच्याकडून त्रास होत असल्याचे व्हिडिओ सापडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

Agricultural Assistant Yogesh Sonawane
Agriculture Department: राज्यात आठ पालक संचालकांची निवड; कृषी आयुक्तांचा नवा निर्णय!

आंदोलनाचा इशारा

योगेश शिवराम सोनवणे यांना न्याय मिळावा आणि या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी. संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करून त्यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी तत्काळ विभागीय चौकशी लावण्यात यावी.

या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी राज्यातील सर्व कृषी सहायक कार्यालयात उपस्थित राहून काळ्या फिती लावून एकदिवसीय असहकार आंदोलन करतील. आपण स्वतः संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सोनवणे यांच्या कुटुंबीयांसह आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल, असेही विलास रिंढे यांनी म्हटले आहे. याबाबत संघटनेने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री आशिष जैस्वाल, कृषी सचिवांना पाठवले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com