Indian Agriculture: आजच्या जागतिकीकरणाच्या आणि उदारीकरणाच्या काळात कृषी क्षेत्रापुढे उभे राहिलेले सर्वांत महत्त्वाचे आव्हान म्हणजे शेतीसंबंधी मालमत्तेचे वाढते खासगीकरण! जमीन, पाणी, बियाणे, पशुधन, उत्पादन साधने आणि कृषी व्यवसायावर आधारित संसाधने यांचे सार्वजनिक-लोकसहभागातून खाजगी मालकीकडे होणारे संक्रमण हा केवळ आर्थिक बदल नाही, तर ग्रामीण सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संरचनेत मोठा बदल घडविणारी प्रक्रिया आहे. स्वयंपूर्ण खेडी ही गेल्या १०० वर्षांत अधिक परावलंबी तर झालीच परंतु ते होताना अप्रत्यक्षपणे लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक दर्जामध्ये अधिक सकारात्मक बदल झाल्याचे सुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. .हळूहळू शेतकरी स्वत: जमीन नांगरणार, कुळवणार, पेरणार, काढणी करणार, शेतीमालाचे खळे तयार करणार, शेतीमाल साठवणार आणि त्याची विक्रीसुद्धा मार्केटमध्ये जाऊन स्वत: करणार ही संपूर्ण प्रक्रिया वैयक्तिकरीत्या शेतकरी करणे इथूनपुढे अवघड होत जाणार आहे व त्याला ते परवडणारे सुद्धा नाही. त्याऐवजी स्पेशलायझेशन तयार होऊन शेतातील वेगवेगळी कामे वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत होऊ लागली आहेत. थोडक्यात, उद्योगांप्रमाणेच शेतीमध्ये सुद्धा आऊटसोर्सिंगला सुरुवात झाली आहे..द्राक्षे, ऊस आणि केळी या पिकांमध्ये शेतकरी आता शेतीत राबण्याचे कोणतेच काम करीत नाही. लागवड करत असताना रोपे विकत आणणे, वाहतूकदाराकडून ती शेतापर्यंत आणणे, गड्यांमार्फत ते लावून घेणे, शेताला पुन्हा गड्यांमार्फत पाणी देणे, खाजगी गड्यांमार्फत खांदणी, बांधणी, फवारणी करणे, व्यापाऱ्यांना जागेवर उकट्या पद्धतीने फळबागा विकत देणे व त्यावर सुपर व्हिजन ठेवणे अशी शेतकऱ्यांची कामे उरली आहेत. यातील प्रत्येक छोटे छोटे काम आता शेतकरी दुसऱ्यांकडून ठोक पद्धतीने करून घेत आहे..Agriculture Development: ‘आयएएस’ करतील शेतीचा कायापालट.खासगीकरण म्हणजे सरकार, समुदाय किंवा सार्वजनिक मालकीतील संपत्ती, संसाधने किंवा सेवा खासगी उद्योग, संस्था किंवा व्यक्तींना हस्तांतरित करणे. शेतीच्या मालमत्तेच्या संदर्भात यामध्ये खालील घटकांचा समावेश होतो.कृषी जमीन विक्री किंवा भाडेतत्त्वावर देणेबियाणे आणि कृषी तंत्रज्ञानावर कॉर्पोरेट नियंत्रणसिंचन जलस्रोतांचे खासगी व्यवस्थापनकृषी उत्पादन व्यापार व्यवस्थेतील कंपन्यांचे वर्चस्व.भारतासह अनेक विकसनशील देशांमध्ये खालील कारणांमुळे शेतीचे खासगीकरण वाढत आहे.सार्वजनिक कृषी सुविधा जसे गोदामे, सिंचन प्रकल्प किंवा संशोधन संस्थांमध्ये निधीअभावी खासगी गुंतवणूक वाढली आहे.मोठ्या कंपन्या आधुनिक यंत्रसामग्री, ड्रोन, बायोटेक बियाणे व अॅग्रो-प्रोसेसिंग सुविधा देतात.जमीन ही संपत्ती नसून गुंतवणूक माल म्हणून पाहिली जात आहे.शेतकरी कर्जबाजारीपणामुळे मालमत्ता विकण्यास मजबूर होतात.खासगीकरणामुळे काही सकारात्मक परिणामही दिसून येतात:यंत्रसामग्री, प्रगत बी-बियाणे, स्मार्ट शेती तंत्रज्ञान उपलब्ध होते.अॅग्रो-बेस्ड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून शेतीमाल प्रक्रिया करून जास्त किंमत मिळू शकते.मोठ्या प्रमाणावर केलेली शेती (corporate farming) उत्पादन आणि कार्यक्षमता वाढवते.ग्रामीण अर्थव्यवस्थेत निधी, नोकऱ्या आणि उद्योगांची शक्यता निर्माण होते..Agriculture Electricity : शेतीला पूर्णवेळ मोफत वीज देऊन खुशाल खासगीकरण करा.मात्र खासगीकरणाचे नकारात्मक परिणाम अधिक गंभीर आहेत. कॉर्पोरेट शेती किंवा जमीन अधिग्रहणामुळे शेतकरी जमीनविहीन होण्याचा धोका वाढतो. कंपन्या इनपुट (बियाणे, खत) ते आउटपुट (बाजार) सर्व नियंत्रित करू लागतात. उच्च खर्चाचे तंत्रज्ञान वापरल्याने शेतकरी कर्जबाजारी होतात. कॉर्पोरेट बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांचा नाश होतो. जमीन गमावल्यावर ग्रामीण लोकसंख्या शहरांत स्थलांतरित होते. कृषी मालमत्तेचे खासगीकरण पुढील आव्हाने निर्माण करते..काही कंपन्यांकडे धान्य उत्पादनाचा ताबा गेल्यास अन्नाचे नियमन बाजाराधारित होईल.मोठे कृषी उद्योग वाढतील आणि लहान शेतकरी मागे पडतील.शेती संस्कृती, कौशल्य आणि जीवनशैलीवर परिणाम होतो.खासगीकरणाच्या परिस्थितीत खालील उपाय शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवू शकतात.शेतकरी उत्पादक कंपन्या - सामूहिक खरेदी-विक्री, प्रक्रिया आणि निर्यात क्षमता वाढतेसहकारी कृषी उद्योग - अमूल मॉडेल प्रमाणे सामूहिक उत्पादन आणि नफा वाटपसार्वजनिक-खाजगी भागीदारी - तंत्रज्ञान खासगी क्षेत्राकडून आणि जमीन व्यवस्थापन शेतकऱ्यांकडे कृषी जमिनींचे संरक्षणात्मक कायदे -जमीन विक्रीवर नियंत्रण किंवा कृषी जमिनींचा विनियोग मर्यादित करणे.उदारीकरण आणि खासगी क्षेत्राच्या सहभागाला संपूर्ण विरोध करणे अवघड आहे; परंतु हा सहभाग शेतकरी हित आणि अन्नसुरक्षा यांच्याशी सुसंगत असला पाहिजे. सरकारने पुढील धोरणांवर भर देणे आवश्यक आहे जसे, लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी संरक्षणात्मक कायदे, स्थानिक बियाणे बँक आणि कृषी हक्क सुरक्षित करणे, सार्वजनिक कृषी संशोधन वाढवणे, कृषी शिक्षण व डिजिटल प्रशिक्षण, शाश्वत शेती आणि जैवविविधता संरक्षण.शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे खासगीकरण हा केवळ आर्थिक व्यवहार नसून ग्रामीण भारताच्या भविष्याचा प्रश्न आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आवश्यक आहे, परंतु त्याचा फायदा काही कंपन्यांना नव्हे तर शेतकऱ्यांना मिळायला हवा. शेती केवळ एक व्यवसाय नाही. त्यामुळे खासगीकरणाचे निर्णय विचारपूर्वक, संतुलित आणि शेतकरी केंद्रित असणे अत्यावश्यक आहे.shekharsatbara@gmail.com.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.