Seed Policy : बियाणे कंपन्यांच्या धोरणामुळे कृषी व्यावसायिक त्रस्त

Cotton Cultivation : अमरावतीसह अनेक जिल्ह्यांत खरिपात कापसाची लागवड मोठ्या क्षेत्रावर होते. त्यासाठी शेतकऱ्यांकडून एकाच बियाणे वाणाची मागणी होते.
Seed Production
Seed ProductionAgrowon

Amaravati News : मागणी असलेल्या कापूस वाणांची बुकिंगसाठी आगाऊ आणि पूर्ण रक्‍कम घेत नंतर बियाणे पुरवठा मात्र कमी करायचा. उर्वरित रक्‍कम आठ ते दहा महिन्यांसाठी वापरायची आणि त्यातून इतर उद्योग करायचे, असे बनवाबनवीचे धोरण कंपन्यांकडून हंगामाच्या तोंडावर दरवर्षी राबविले जाते. त्यामुळे कृषी व्यावसायिक देखील जेरीस आले आहेत. मात्र व्यवसाय करायचा असल्याने त्यांच्यासमोर तोंड दाबून हा मार सोसण्याशिवाय पर्यायच नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

अमरावतीसह अनेक जिल्ह्यांत खरिपात कापसाची लागवड मोठ्या क्षेत्रावर होते. त्यासाठी शेतकऱ्यांकडून एकाच बियाणे वाणाची मागणी होते. परंतु काही विशिष्ट कंपन्यांकडून हंगामाच्या तोंडावर कृषी व्यावसायिकांना त्यांनी १०० पाकिटांची मागणी नोंदविली असताना त्यांना २० ते ५० इतक्‍या अत्यल्प प्रमाणात बियाणे पाकीट पुरविले जातात.

Seed Production
Soybean Seeds : स्वतःचे सोयाबीन बियाणे वापरा

नैसर्गिक आपत्तीचा बीजोत्पादन क्षेत्राला फटका बसल्याने बियाणे उत्पादकता कमी झाली. त्यामुळे पाकिटांचा पुरवठा कमी करावा लागत असल्याचे कारण कंपन्या देऊन मोकळे होतात. मात्र कृषी व्यावसायिकांना संबंधित कंपनीचे बियाणे घेण्यासाठी सहा ते सात महिन्यांआधीच कंपनीकडे बुकिंग करावे लागते.

१०० पाकिटांची मागणी केल्यास त्यासाठीची पूर्ण रक्‍कम सात महिन्यांपूर्वीच अदा करावी लागते. तब्बल ८६ हजार ४०० रुपयांचा भरणा कृषी व्यावसायिक कंपनीकडे करतात. त्यानंतर कंपनी मात्र २० ते ५० पाकिटांचाच पुरवठा करते. उर्वरित रक्‍कमही परत न देता शिल्लक रकमेचे ज्वारी, मका किंवा इतर हवे असलेले बियाणे दिले जाते. त्यामुळे कृषी व्यावसायिकांना दुहेरी नुकसान सोसावे लागते, अशी स्थिती आहे.

Seed Production
Turmeric Seed : छत्तीसगडला ‘एमपीकेव्ही’च्या हळद बियाण्याची भुरळ

कंपन्यांकडून सात महिन्यांपूर्वीच आगाऊ बुकिंग होते. त्याकरिता पूर्ण रक्‍कम घेतात. परंतु बियाणे पुरवठा मागणीपेक्षा कमी असतो. रक्‍कम पूर्ण घेतलेली असते, अशाप्रकारे कोट्यवधी रुपयांचा निधी उभारून कंपन्या हा पैसा इतर प्रकल्पात गुंतवतात. यामध्ये केवळ कृषी व्यावसायिक भरडला जातो.

बाजारातच होते काळाबाजार

काही कंपन्यांनी तर असा कृत्रिम तुटवडा निर्माण करीत त्या आड बियाण्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन दिली आहे. त्यांच्याकडून जरी बियाणे शासन शिफारशीत दराने पुरविले जात असले तरी शेतकरी मात्र तुटवडा असल्याने जादा रक्‍कम देऊनही त्यांना हवे त्या कंपनीचे बियाणे घेण्यास तयार असतात. त्यामुळे बाजारात ८६४ रुपये असा दर असताना मागणी असलेल्या बियाण्याचे दर काही हजारांच्या पुढे जातात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com