
Chh. Sambhajinagar News : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राची गुरुवारी (ता.२९) पाहणी केली. यादरम्यान त्यांनी संशोधन आणि पायाभूत सुविधांच्या गरजा जाणून घेतल्या.
कृषी संशोधन केंद्र बदनापूरद्वारे कडधान्य गुणवत्ता संशोधन केंद्राचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे. कृषी संशोधन केंद्राच्या भविष्यातील संशोधनाच्या दृष्टीने नेमका कसा प्रस्ताव असावा याकरिता व्यक्तीश: पाहणी करण्याचे कृषिमंत्री यांनी २० एप्रिल रोजी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे येथे झालेल्या बैठकीत म्हटले होते.
या अनुषंगाने कृषी संशोधन केंद्राच्या पीक रोग शास्त्र, पीक पैदास, कृषी कीटकशास्त्र आणि जुन्या कार्यालयाची पाहणी केली.कृषी संशोधन केंद्राच्या परिसरात असलेल्या निवासस्थानांची सुद्धा पाहणी केली. एकंदरीतच इमारतींची दुरवस्था पाहून आजपर्यंत इमारतीचे प्रस्ताव का सादर केले नाहीत अशी विचारणा केली.
साधारणतः गेल्या २० वर्षांपासून याबाबत पाठपुरावा होत असल्याची माहिती या वेळी प्रभारी अधिकारी यांनी त्यांना दिली. या वेळी कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या तूर, मूग, उडीद आणि हरभरा या पिकांच्या वाणांची कृषिमंत्री यांनी माहिती घेतली.
विशेषतः तुरीचे बीडीयन २, बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३, बीडियन ७११, गोदावरी मुगामधील बीएम २००३-२ आणि हरभऱ्यामधील आकाश, परभणी चना या वाणांची प्रभारी अधिकारी यांनी माहिती दिली. या वेळी कृषी संशोधन केंद्रामधील शास्त्रज्ञ, जिल्हा कृषी अधिकारी जालना, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख, कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि शेतकरी उपस्थित होते.
इमारतीचे आरेखन सादर करा
एकंदरीतच इमारतींची दुरवस्था पाहून कृषिमंत्री यांनी २ जून रोजी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद येथे होणाऱ्या बैठकीत सुव्यवस्थित, सुनियोजित आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन उत्तम दर्जाच्या इमारतींचे आरेखन आणि त्यावरील सादरीकरण करण्याच्या सूचना केल्या.
विद्यार्थ्यांनी केली वसतिगृहाची मागणी
यानंतर कृषी महाविद्यालय बदनापूर येथे कृषी विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधला. या वेळी विद्यार्थिनींनी वसतिगृहाची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन वसतिगृहाचा प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या सूचना अभियंता यांना दिल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.