Memorandum of Understanding : दापोली येथील कृषी विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठाशी करार

Dapoli Agriculture University and Australian University : नुकत्याच झालेल्या करारानुसार कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता कृषी शाखेची ऑस्ट्रेलियात पदव्युत्तर पदवी घेता येणार आहे.
Memorandum of Understanding
Memorandum of UnderstandingAgrowon
Published on
Updated on

Dapoli News : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या करारानुसार कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता कृषी शाखेची ऑस्ट्रेलियात पदव्युत्तर पदवी घेता येणार आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान नुकताच वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाचे कुलगुरू प्रा. जॉर्ज विलियम्स आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. सतीश नारखेडे यांनी भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली येथे महासंचालक डॉ. आर. सी. अगरवाल यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर सह्या केल्या.

Memorandum of Understanding
VNMKV Parbhani : ‘वनामकृवि’ आणि वेस्टर्न सिडनी विद्यापीठांत सामंजस्य करार

या करारानुसार कृषी विद्यापीठामध्ये तीन वर्षांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चौथे एक वर्ष वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलिया येथे पूर्ण करता येणार आहे. तसेच अधिकचे एक वर्ष सिडनी युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केल्यास दोन वर्षांमध्ये त्यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची पदवी व वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीद्वारा पदव्युत्तर पदवी अशा दोन पदव्या केवळ पाच वर्षांच्या कालावधीत मिळणार आहेत.

Memorandum of Understanding
Memorandum of Understanding : जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ४६६१ कोटींचे सामंजस्य करार

सदरचे शिक्षण ऑस्ट्रेलियात जाऊन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सहाव्या सत्रामध्ये अर्ज करावे लागतील व त्यानंतर त्यांची वेस्टर्न युनिव्हर्सिटी सिडनीमार्फत निवड होणार आहे. सामंजस्य करार करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. सतीश नारखेडे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील विविध विद्या शाखांमधील विद्यार्थ्यांना आता परदेशात जाऊन कृषीचे शिक्षण पूर्ण करणे सहज शक्य होणार आहे.

दोन पदव्या घेणे आता सहज शक्य

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सातव्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पुढील शिक्षण घेण्याकरिता पात्र ठरवले जाईल. अशा प्रकारचा सामंजस्य करार भारतातील इतर कृषी विद्यापीठांनी देखील केला असल्याने कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी पदवी व पदव्युत्तर अशा दोन पदव्या घेणे आता सहज शक्य होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com