Crop Damage
Crop DamageAgrowon

Crop Damage Compensation : नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन

Unseasonal Rain : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या सर्व प्रकारच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा राज्य शासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल.
Published on

Nagar Rain News : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या सर्व प्रकारच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा राज्य शासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

राहुरी‌ येथे गुरुवारी (ता.११) तहसीलदारांना देण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) रवींद्र मोरे, प्रकाश देठे, जुगलकुमार गोसावी, सुनील इंगळे, सतीश म्हसे, राहुल करपे, सचिन गडगुळे, राहुल काळे, गणेश आघाव, अभिजित खडके, किशोर वराळे, बबन आघाव यांनी शासनाला निवेदन दिले.

Crop Damage
Unseasonal Rain : अवकाळी पाऊस बळिराजाचा पिच्छा सोडेना!

या निवेदनात म्हटले आहे, की शासनाद्वारे एक ते पाच मे २०२३ दरम्यान गारपिटीमुळे झालेले शेतीमालाच्या नुकसानीचे दिशाभूल करणारे शासनादेश तत्काळ रद्द करावेत. या शासनादेशात फक्त उभ्या पिकांचे किंवा शेतात असलेल्या मालाचे पंचनामे करावेत, ही बाब चुकीची आहे.

शेतकऱ्यांनी अवकाळी पाऊस झाल्यानंतर हाताशी येईल तेवढा शेतीमाल काढून घेऊन शेत मोकळे केले आहे, परंतु नंतर झालेल्या पावसाने उर्वरित शेतीमाल खराब होऊन गेला. पंचनाम्यावेळी कोणतेही पीक शिल्लक राहिले नाही.

शासनाच्या आदेशाप्रमाणे महसूलचे कर्मचारी नुकसान झालेल्या किंवा शेतकऱ्यांनी गारपिटीमुळे काढून घेतलेल्या पिकांचे पंचनामे करण्यास तयार नाहीत.

शासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक

शासनातर्फे शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाली आहे. पीकपेर नोंदीनुसार पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. शासन निर्णयात दुरुस्ती करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com