Akola News: शेतकऱ्यांच्या प्रयोगशीलतेतून नवनवीन पिकांना चालना मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे चीया सीड लागवड. मागील दोन रब्बी हंगामांत वाशीम जिल्ह्यात चीया सीड लागवड करून शेतकऱ्यांनी राज्याचे, सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांमध्ये या पिकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली असून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये येत्या रब्बीत चीया सीड लागवड वाढण्याची चिन्हे आहेत..प्राथमिक अंदाजानुसार, प्रामुख्याने विदर्भात या रब्बी हंगामात चीया सीडचे क्षेत्र तब्बल १० हजार हेक्टरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाशीम जिल्ह्यात यंदाही या पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होणार असून जिल्हा कृषी विभागाने ‘कृषी समृद्धी’ योजनेतून सुमारे ३७५० प्रात्यक्षिकेसुद्धा प्रस्तावित केली आहेत. प्रत्येक प्रात्यक्षिक एक एकर क्षेत्रावर घेण्यात येणार आहे. याशिवाय शेतकरी वैयक्तिक पातळीवरही लागवड करण्यास उत्सुक असल्याने वाशीम जिल्ह्यातील चीया लागवडीचे क्षेत्र पाच हजार हेक्टरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात या जिल्ह्यात सुमारे ३६०० हेक्टरवर लागवड झाली होती..Chia Seed : वाशीममधील चियासीड पोहोचले मुख्यमंत्र्यांपर्यंत .चीया सीड हे पीक सध्या तरी शेतकऱ्यांसाठी सर्वार्थाने फायदेशीर ठरते आहे. मागील वर्षी या पिकाला क्विंटलमागे १२ ते १४ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. दरम्यान, काही काळ बाजारभाव २४ हजार रुपयांपर्यंत झेपावले होते. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या मानाने चांगला आर्थिक फायदा झाला. एकरी चार ते पाच क्विंटलपर्यंत उत्पादकता, जनावरांकडून कोणताही त्रास न होणे, तुलनेने कमी उत्पादन खर्च आणि बाजारात सुपरफूड म्हणून वाढती मागणी ही चीया सीडची आकर्षक वैशिष्ट्ये ठरत आहेत..वाशीममध्ये यशस्वी ठरलेले हे पीक आता हळूहळू इतर जिल्ह्यांमध्येही पाय पसरू लागले आहे. नावीन्यपूर्ण पिकांच्या प्रचाराच्या दृष्टीने अकोला जिल्ह्यातही यंदा चीया सीड रब्बीत प्रस्तावित केले जात आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांनी रब्बी हंगामात लागवडीचे नियोजन सुरू केले आहे. एकूणच वाशीम जिल्ह्यात रुजलेला चीया सीडचा प्रयोग आता राज्यभर विस्ताराच्या मार्गावर आहे. उच्च उत्पादनक्षमता, कमी खर्च आणि उत्तम बाजारभाव यामुळे हे पीक शेतकऱ्यांच्या नव्या उत्पन्नाच्या शक्यता वाढवत आहे. वाढती लागवड पाहता चीया सीडच्या बियाण्याची मागणीसुद्धा वाढणार आहे..Chia Farming : बदलत्या हवामानात चिया पीक देईल आर्थिक स्थैर्य .बुवनेश्वरी एस. यांनी रुजवले पीकवाशीमच्या जिल्हाधिकारीपदाच्या काळात बुवनेश्वरी एस. यांनी या जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी चीया सीडला प्रोत्साहन दिले. त्यांच्या पुढाकाराने कृषी विभागाने काम केले. पहिल्या हंगामात सुमारे ९०० हेक्टरपर्यंत लागवड झाली. दुसऱ्या हंगामात ३६०० हेक्टरपर्यंत हे क्षेत्र पोहोचले होते. हे पीक विक्रीच्या दृष्टीने बुवनेश्वरी यांनी काही कंपन्यांमार्फत खरेदीची व्यवस्थासुद्धा तयार करून दिली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. आता नवे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनीही चीया सीडबाबत सकारात्मक भूमिका घेत जिल्हा कृषी विभागाला याबाबत सूचना केली..चीया सीड लागवडीकडे शेतकऱ्यांमध्ये कल वाढत आहे. कृषी समृद्धी योजनेतून सुमारे ३७५० प्रात्यक्षिकांचे नियोजन करून वरिष्ठांना प्रस्ताव दिला आहे. जिल्ह्यात या हंगामात पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड होईल, असे दिसून येते.आरिफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.