Local Body Election: ‘झेडपी’, पंचायत समितीच्या निवडणुकीत राजकारण तापणार
Election Update: महानगरपालिकांच्या निवडणुकांचा धुराळा शमण्याआधीच पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. शुक्रवारपासून (ता. १६) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी धावपळ सुरू केली आहे.