Shaktipeeth highway : कोल्हापूर, सांगलीनंतर नांदेडचे शेतकरी शक्तिपीठ विरोधात; तब्बल तासभर महामार्ग रोखला

Nanded Farmers : शक्तिपीठ महामार्गासाठी १२ जिल्ह्यातून ८०० किलोमीटरहून अधिक रस्त्यासाठी भूसंपादन होणार आहे. या महामार्गाला शेतकऱ्यांमधून जोरदार विरोध होत आहे.
Shaktipeeth highway
Shaktipeeth highwayagrowon
Published on
Updated on

Maharashtra Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गासाठी १२ जिल्ह्यातून ८०० किलोमीटरहून अधिक रस्त्यासाठी भूसंपादन होणार आहे. या महामार्गाला शेतकऱ्यांमधून जोरदार विरोध होत आहे. कोल्हापूर, सांगलीनंतर आता नांदेड जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध होत आहे. नांदेडमधील बाधित शेतकरी रस्त्यावर उतरले असून आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.०५) नांदेड ते वसमत या महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.

नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची सुपीक जमीन या महामार्गात जात असल्याने या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शिवाय हा महामार्ग कंत्राटदारांच्या भल्यासाठी असून याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही. त्यामुळे या महामार्गाला आम्ही १ इंच ही जमीन देणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. रास्तारोकोवेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

Shaktipeeth highway
Kolhapur : समृद्धीसाठी चौपट मोबदला; नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी का नाही? कोल्हापूरच्या नेत्यांचा पालकमंत्र्यांना सवाल

१ तास केला रास्ता रोको

शक्तीपीठ महामार्गा संदर्भात शेतकऱ्यांमध्ये २ गट पडले आहेत. १ गट या महामार्गाच्या समर्थनार्थ आहे; तर दुसरा गट महामार्गाच्या विरोधात आहे. यातील महामार्गाला विरोध करणाऱ्या गटाने नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात नांदेडच्या मालेगाव येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. नांदेड ते वसमत हा महामार्ग शेतकऱ्यांनी तब्बल १ तास रोखून धरला होता. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूनी वाहतूक ठप्प झाली होती.

भाजप खासदार अशोक चव्हाणांचा विरोध

शक्तिपीठ महामार्गाला नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांनी तीव्र विरोध केला आहे. "शेतकऱ्यांच्या कुठल्याही हिताचा हा महामार्ग नसल्याने या महामार्गाला विरोध होत आहेत. नांदेडमधून देखील हा महामार्ग जात असून या महामार्गाला नांदेड जिल्ह्यातील शेतकरी विरोध करीत आहेत. शक्तीपीठ महामार्गाला पूर्वीही विरोध होता आणि आता ही माझा विरोध आहे. मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांना भेटून यातून पर्यायी मार्ग काढता येईल का? हे पाहावे लागणार आहे". अशी माहिती भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ता. २) नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ महामार्गावर भाष्य केले. शक्तिपीठ महामार्गाला कुणाचाही विरोध नसल्याचे फडणवीस म्हणाले. आमदारांची बैठक झाली यावेळी आमदारांनीही शक्तिपीठ महामार्गाला विरोध नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com