Pune News: अफगाणिस्तानच्या हिंदूकुश प्रदेशात रविवारी (ता. ३१) रात्री ११.४७ वाजता ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भीषण भूकंप झाला. या हादऱ्यात ८०० जणांचा मृत्यू झाला असून, २५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. डोंगराळ व दुर्गम भागात अनेक इमारती कोसळल्याने जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे..अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र बसावूल शहराच्या उत्तरेस सुमारे २२ मैलांवर आणि जमिनीपासून अवघ्या ८ किलोमीटर खोलीवर होते. पूर्वेकडील नुरगल, सुकी, वाटपूर, मानोगी आणि चापे-दारे या भागात सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे..Earthquake : नांदेड जिल्ह्यासह हिंगोलीच्या अनेक भागात चार दिवसात दुसऱ्यांदा भूकंपाचे सौम्य धक्के.विशेष म्हणजे, या भूकंपानंतर अवघ्या २० मिनिटांत पुन्हा ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला. दुहेरी धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालिबान सरकारनुसार मृतांमध्ये बहुसंख्य कुनार प्रांतातील आहेत. या भागात भूकंपरोधक नसलेल्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मदतकार्य अडचणीत आले आहे..Solapur Earthquake : सोलापुरातील सांगोला तालुक्यात भूकंपाचे धक्के; राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राची माहिती.भूकंपानंतर रुग्णालयांमध्ये जखमींची गर्दी वाढली असून, वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र उपचार करत आहेत. कुनार प्रांतात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. हा डोंगराळ व दुर्गम भाग असल्यामुळे आणि येथील अनेक घरे भूकंपरोधक नसल्यामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. जखमींना दुर्गम भागातील जखमींना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर सुरू असून, त्यांना नांगरहार विमानतळावर आणून रुग्णवाहिकांनी रुग्णालयात हलवले जात आहे.या दरम्यान, तालिबान सरकारकडे संसाधनांची कमतरता असल्याने आंतरराष्ट्रीय संस्थांना तातडीने त्यांनी मदतीची विनंती केली आहे. तसेच, स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि सुरक्षा दल बचावकार्यात गुंतले असून, या आपत्तीत हजारो लोक बेघर झाले आहेत. याआधी ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात तब्बल १४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरचा हा दुसरा सर्वात मोठा भूकंप आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.