डॉ. विक्रम कड, डॉ. गणेश शेळके, डॉ. सुदामा काकडे Indian Agriculture: लवकर खराब होणाऱ्या फळे व भाजीपाल्यासारख्या नाशिवंत उत्पादनांचे आयुष्यमान वाढविण्यासाठी शीतगृह, नियंत्रित वातावरण साठवण, पॅकेजिंग अशा अनेक पद्धतींची माहिती घेतली. या लेखामध्ये साठवणुकीसाठी गॅमा किरणोत्साराचा वापर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साठवणुकीच्या आधुनिक, प्रगत व प्रभावी पद्धतीची माहिती घेऊ..गॅमा किरणांचा वापर करून साठवणूकअन्नधान्यांच्या साठवणुकीमध्ये किरणोत्साराचा (गॅमा किरणांचा) वापर केला जातो. ही गॅमा किरणे ही उच्च उर्जायुक्त आयोनायझिंग किरणे असून, ती अन्नपदार्थांमधील सूक्ष्मजीव, कीड आणि बुरशी यांचा नाश करतात. त्यामुळे उत्पादने दीर्घकाळापर्यंत सुरक्षित राहतात..कार्यपद्धतीसर्वसाधारणपणे कोबाल्ट ६० (Cobalt-६०) किंवा सेसियम १३७ (Cesium-१३७) या समस्थानिकांपासून तयार होणाऱ्या गॅमा किरणांचा अन्नधान्य उत्पादनांमध्ये प्रयोग केला जातो. ही किरणे फळे व भाज्यांच्या पृष्ठभागावरील व आतपर्यंत प्रवेश करून तेथील जिवाणू, बुरशी व कीटकांना निष्क्रिय करतात. त्यांची वाढ रोखतात. तसेच उत्पादनांचे अंकुरण थांबते, परिपक्वता किंवा पिकण्याची प्रक्रिया मंदावते आणि साठवणुकीचा कालावधी वाढतो..रचनासंपूर्ण संयंत्र जाड काँक्रिट किंवा स्टीलच्या भिंतींनी आच्छादित असते.आतील कक्षात कोबाल्ट -६० चे रॉड पाण्यात साठवून ठेवतात. त्यामुळे विकिरणाची गळती होत नाही.उत्पादन कन्व्हेअर बेल्टवर ठेवून नियंत्रित प्रमाणात त्यावर गॅमा किरणोत्सर्ग केला जातो.बाहेर निघताना उत्पादन सुरक्षित व सेवनासाठी योग्य असते..Agriculture Storage: दाबावर आधारित शेतीमाल साठवणुकीच्या पद्धती.फायदेफळे व भाज्यांचे आयुष्यमान वाढते.अंकुरण थांबते (उदा. कांदा, बटाटा).कीटक व बुरशी नष्ट होतात.रासायनिक कीडनाशके किंवा संरक्षक पदार्थांचा वापर करावा लागत नाही.पोषक घटक व चव बऱ्याच प्रमाणात जतन होते.आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यातीसाठी स्वच्छ व सुरक्षित उत्पादन मिळते.तोटेयंत्रसामग्रीची स्थापना व देखभाल महागडी आहे.किरणोत्सर्गाची अतिरिक्त मात्रा दिल्यास अन्नाचा स्वाद, रंग व पोषणमूल्य बदलू शकते.उच्च तांत्रिक व सुरक्षा प्रशिक्षण आवश्यक..काय करावे?केवळ मान्यताप्राप्त व प्रमाणित डोस वापरावा.केवळ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच गॅमा युनिट चालवण्याची परवानगी असावी.प्रक्रिया झाल्यानंतर उत्पादनांना योग्य ते लेबल लावावे. त्यासाठी लेबलिंगच्या नियमांचा आधार घ्यावा.गॅमा युनिटच्या आजूबाजूला कडक सुरक्षा नियम पाळावेत.काय करू नये?गॅमा किरणोत्सर्गाच्या संपर्कात मनुष्य, प्राणी किंवा नाजूक उपकरणे येणार नाहीत, याची काळजी घ्यावी.जास्त प्रमाणात (Overdose) विकिरण देऊ नये..कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सक्षम प्रगत साठवणूक संरचनाकृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि इंटरनेटच्या साह्याने उपकरणे जोडणे (इंटरनेट ऑफ थिंग्ज -IoT) या तंत्रज्ञानाचा वापर शीतसाखळी व्यवस्थापनात केला जाऊ लागला आहे. त्यामुळे शीतसाखळीची कार्यक्षमता वाढते. बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेत विविध स्रोतांचा प्रभावी वापर (ऑप्टिमाइझ) करणे शक्य होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मालाच्या साठ्याचे (इन्व्हेंटरी) व्यवस्थापन सुधारणे शक्य झाले आहे. शीतसाखळीतील उत्पादनांच्या नियमित गुणवत्ता निरीक्षणासाठी, त्याच्या संभाव्य नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी आणि पुरवठा साखळीची कार्यक्षमता (ऑप्टिमायझेशन) वाढविण्यासाठी एआय आणि आयओटी चा वापर महत्त्वाचा ठरत आहे..गुणवत्ता निरीक्षण आणि नुकसान अंदाज : आयओटी तंत्राने जोडले गेलेले विविध प्रकारचे सेन्सर (तापमान, आर्द्रता व अन्य) शीतगृहांमधील पर्यावरणीय परिस्थितीची प्रत्यक्ष वेळेवरील माहिती उपलब्ध करत असतात. या रिअल-टाइम डेटाचे विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग (ML) कार्यप्रणालीद्वारे केले जाते. या कार्यप्रणाली उपकरणांच्या कार्यपद्धतींचे निरीक्षण करून संभाव्य बिघाडाचे संकेत ओळखतात. तापमानात चढ-उतार झाल्यास वापरणाऱ्याला त्वरित अलर्ट देतात. .परिणामी उत्पादनाचे संभाव्य नुकसान टाळता येते. मशीन लर्निंग कार्यप्रणाली ही सातत्याने अपडेट होत कार्यप्रणालीतील त्रुटी (लुपहोल्स) दूर करण्याचे काम करते. त्यामुळे शेतीमालाचे काढणी पश्चात होणारे नुकसान टळते. तसेच कचऱ्याचे प्रमाण वर्तविण्यासाठी प्रभावी ठरतात. मशीन व्हिजन प्रणालीमधील कॅमेऱ्यांसह विविध प्रकारचे घटक हे फळांची गुणवत्ता वर्गीकरण, परिपक्वता आणि रोग यांची जलद आणि अचूक ओळख पटविण्यात मदत करतात..पुरवठा साखळी प्रमाणीकरण (ऑप्टिमायझेशन): कृत्रिम बुद्धिमत्ता बाजारपेठेतील मागणीचा अचूक अंदाज लावण्यास आणि वाहतुकीसाठी प्रमाणीकरण (लॉजिस्टिक्स ऑप्टिमाइझ) करण्यास मदत करते. त्यामुळे साठवणुकीतील नासाडी कमी होते. एआय -चलित डायनॅमिक राउटिंग अल्गोरिदम वाहतुकीचा वेळ आणि इंधनाचा वापर कमी करतात. AI-आधारित प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स रेफ्रिजरेशन युनिटमधील संभाव्य बिघाड ओळखतो. त्यामुळे डाउनटाइम कमी होतो आणि उत्पादनाची नासाडी टाळता येते..IoT-आधारित विश्लेषणात्मक (ॲनालिटिक्स) शीतसाठवणूक सुविधांमधील ऊर्जा वापर १० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी करू शकतात. उदा. काही परदेशी एआय आधारीत ॲप्सने पिकांच्या उत्पादनामध्ये ३० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. क्रॉपिन सेज (Cropin Sage) सारखे एआय आधारित कृषी-इंटेलिजन्स सोल्यूशन्स पुरवठा साखळीला अधिक सुरक्षित आणि भविष्यवेधी बनवत आहेत..भविष्यातील शक्यताएआय आणि आयओटी तंत्रज्ञान शीतसाखळीत अनेक स्तरांवर सुधारणा करत आहे.अंदाजात्मक विश्लेषण प्रणाली (प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्स) मुळे उपकरणांचे संभाव्य बिघाड वेळेपूर्वीच ओळखता येतात. त्यामुळे दुरुस्ती खर्चात बचत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शीतसाखळी बंद राहण्याचा कालावधी (डाउनटाइम) कमी होतो.मागणीचा अंदाज आणि वाहतुक प्रमाणीकरणामुळे (लॉजिस्टिक्स ऑप्टिमायझेशनमुळे) अनावश्यक साठवणूक आणि वाहतूक टाळता येते.हे तंत्रज्ञान केवळ तांत्रिक सुधारणा नाही, तर ते शेतकऱ्यांना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करते, त्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि नफा वाढतो..शासकीय पाठिंबाभारत सरकार हे डिजिटल कृषी मिशन (२०२१-२०२५) द्वारे शेतीक्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञान वापरण्यासाठी सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे. त्यात ओपन-सोर्स (मुक्त-स्रोत) कृषी-डेटा प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणे आणि ग्रामीण डिजिटल पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही एआय तंत्रज्ञान पूर्ण क्षमतेने वापरता येईल. शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) द्वारे एआय साधने उपलब्ध करून देण्याच्या दिशेने धोरणात्मक हालचाली होताना दिसत आहेत. .त्यामुळे लहानात लहान शेतकऱ्यांपर्यंत महागडे वाटणारे तंत्रज्ञान कमी खर्चात पोचणार आहे. एआय आणि आयओटी चा वापर केवळ साठवणुकीपुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण कृषी मूल्य साखळीला (पेरणीपूर्व ते काढणीपश्चात) माहिती-आधारित आणि अधिक कार्यक्षम बनवत आहे. हे तंत्रज्ञान पारंपरिक ‘अंतर्ज्ञान-आधारित शेती’ मधून ‘डेटा-चालित, रिअल-टाइम निर्णय घेण्याकडे’ नेत आहे. परिणामी शेतकऱ्यांची कार्यप्रणाली, कार्यक्षमता सुधारण्यासोबतच अन्नधान्यांची नासाडी कमी होणार आहे..गॅमा किरणोत्सार युनिटचे घटकगॅमा किरण स्रोत कोबाल्ट -६० समस्थानिक.संरक्षण कवच शिसे (Lead) किंवा काँक्रिट जाडसर भिंतींचे कवच असलेल्या कक्षाची निर्मिती केली जाते. त्यामुळे उत्पादनांवर गॅमा किरणांचा मारा करत असताना बाहेर गळती होत नाही.उत्पादन वाहक प्रणाली फळे व भाज्या ठेवण्यासाठी कन्व्हेअर बेल्ट किंवा ट्रे.किरणोत्सर्ग कक्ष जिथे फळांवर नियंत्रित प्रमाणात गॅमा किरणे सोडली जातात.नियंत्रण प्रणाली किरणोत्सर्गाचे प्रमाण (Dose) आणि त्यांच्या माऱ्याची वेळ नियंत्रित करण्यासाठी.सुरक्षा यंत्रणा गळती रोखण्यासाठी व मानवी सुरक्षिततेसाठी सेन्सर..उपयोगकांदा व बटाटा अंकुरण रोखण्यासाठी.आंबा, केळी, पपई पिकण्याची प्रक्रिया मंदावण्यासाठी.स्ट्रॉबेरी, द्राक्षे आयुष्यमान वाढविण्यासाठी.भाजीपाला बुरशी व कीटक नाशासाठी.- डॉ. विक्रम कड ०७५८८०२४६९७(कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.