Satara News: सातारा जिल्ह्यात आडसाली, पूर्वहंगामी हंगामातील ऊस लागवड पूर्ण झाली असून सुरू हंगामातील ऊस लागवड सुरू आहे. जिल्ह्यात या तीन हंगामातील आतापर्यंत ६७ हजार ८२२ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली..जिल्ह्यातील प्रामुख्याने कऱ्हाड, सातारा, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत उसाची सर्वाधिक लागवड केली जाते. या तालुक्यात आडसाली हंगामातील ऊस लागवड होते. या लागवडी पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ३४,६१४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत पूर्वहंगामी उसाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन केले..Sugarcane Farming: तंत्र सुरू ऊस लागवडीचे....या पूर्वहंगामात २९८६४ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. सध्या सुरू हंगामातील लागवड सुरू असून आतापर्यंत ४०२४ हेक्टर लागवड सुरू आहे. फेब्रुवारीअखेर हा हंगाम सुरू राहणार असल्याने या क्षेत्रात वाढ होणार आहे. सध्या सुरू असलेला गाळप हंगाम मार्चअखेर सुरू राहणार आहे. हंगाम संपल्यावर खोडवा उसाचे क्षेत्र निश्चित होणार आहे..मात्र एकूण क्षेत्राचा अंदाज बघता एक लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस गाळपास उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.दुष्काळी पट्ट्यासह जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला. त्यामुळे पाण्याची कमतरता भासली नाही. यंदाही अपेक्षित पाऊस झाला आहे. दुष्काळी पट्ट्यात योजना सुरू करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवर्तने सुरू केली आहेत. त्यामुळे या भागातही पाणीटंचाई भासणार नसल्याने ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज आहे..Sugarcane Farming: उसाला तुरे फुटल्याने चिंतेत वाढ.आडसाली वाढते क्षेत्र कारखान्यांची डोकेदुखीऊस लवकर तुटावा तसेच उत्पादन जास्त मिळावे यादृष्टीने आडसाली ऊस लागवड करण्याकडे कल वाढत गेला आहे. यामुळे प्रत्येक वर्षी आडसाली क्षेत्रात वाढ होत गेली आहे. यामुळे आडसाली ऊस तोडणी नियोजन करताना कारखान्यांची डोकेदुखी ठरू लागली आहे. बहुतांश शेतकरी जूनपासून लागवड करत असल्याने एकाच तारखेची नोंदणी जास्त होते. यामुळे एकाच तारखेला ऊस तोडला जात नसल्याने वादावादी होत असते. क्षेत्रात वाढ झाल्याने आडसाली १८ महिनेहुन अधिक काळ ऊस तुटला जात नसल्याने उत्पादन घट होत आहे. पुढील काळात ऊस लागवडीचे नियोजन करावे लागणार आहे. वेगवेगळ्या हंगामात ऊस लागवड होण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान द्यावे लागणार आहे..तालुकानिहाय आडसाली, पूर्वहंगामी व सुरू हंगामातील डिसेंबरअखेर ऊस लागवड (हेक्टरमध्ये)सातारा १५,९०३, जावळी ३९३, पाटण २१८९, कऱ्हाड १६७००, कोरेगाव ९५४४, खटाव ५३७५, माण ८३६, फलटण ११४४७, खंडाळा ३१४७, वाई ३०४२..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.