Cotton Farming : कपाशीत आंतरपीक पद्धतीचा अवलंब करा

Cotton Crop Update : हवामानाचा अंदाज घ्या, लागवड तंत्रात अपेक्षित बदल करा, शास्त्रोक्‍त व्यवस्थापन करून कपाशीत आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबादचे वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. सी. बी. पाटील यांनी दिला.
Cotton Crop Guidance
Cotton Crop Guidance Agrowon

Jalna Cotton Agriculture: हवामानाचा अंदाज घ्या, लागवड तंत्रात अपेक्षित बदल करा, शास्त्रोक्‍त व्यवस्थापन करून कपाशीत आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबादचे वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. सी. बी. पाटील यांनी दिला.

अंबड तालुक्‍यातील जामखेड येथे गुरुवारी (ता. ४) आयोजित ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

सकाळ-ॲग्रोवन व रिवुलीस कंपनीच्यावतीने ‘कापूस लागवड व व्यवस्थापन’ याविषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला अंबडचे तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे शास्त्रज्ञ डॉ. सचिन धांडगे, रिवुलिस इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ शिवराज लोणावळे, कंपनीचे उत्तर-मध्य महाराष्ट्र व्यवस्थापक विकास कुलकर्णी, सरपंच ॲड. रतन तारडे, रिवुलीसचे अधिकृत वितरक काकासाहेब कणसे, नारायण कणसे, ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम वैद्य आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रास्ताविकातून ॲग्रोवनचे प्रतिनिधी संतोष मुंढे यांनी ॲग्रोवनच्या वाटचालीवर प्रकाश टाकत ऍग्रोवन संवाद कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद केली.

Cotton Crop Guidance
Cotton Market: कापूस उत्पादकांच्या दशेला जबाबदार कोण? एचटीबीटीला परवानगी का नाही?

डॉ. पाटील म्हणाले, की किती तापमानात आपण कपाशीची लागवड करतो हे महत्त्वाचे आहे. ४० डिग्रीपुढे तापमान असल्यास ते ४० डिग्रीच्या आत आल्यानंतरच लागवड करावी. यंदा १ जून पूर्वी लागवडीचा अट्टहास करू नये. जमिनीच्या मगदूराप्रमाणे लागवडीच्या प्रचलीत व शिफारशीत पद्धतीचा अवलंब करावा.

यंदा पावसाचा खंड अपेक्षीत धरूनच कपाशीत मुग, उडीद, सोयाबीन, तूर आदी आंतरपिकांचे नियोजन करावे. पावसाचा खंड गृहीत धरूनच खंडात पाणी देण्याची सोय आताच करून ठेवावी, असेही ती म्हणाले.

तालुका कृषी अधिकारी श्री. गिरी यांनी शासनाच्या योजना समजावून सांगितल्या. बॅंक व आधार क्रमांकाची केवायसी करून घेण्याची सूचनाही त्यांनी केली. सुक्ष्‌म अन्न प्रक्रिया उद्योगाविषयी गौरव जैन यांनी माहिती दिली. रिवुलीसचे श्री कुलकर्णी यांनी कंपनीच्या ऍप विषयी माहिती दिली.

सूत्रसंचालनच सकाळचे बातमीदार मंजीत भोजने यांनी तर आभार ॲग्रोवनच्या वितरण विभागाचे अजित वाणी यांनी मानले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रिवूलिस कंपनीचे वितरक काकासाहेब कणसे, ग्रामपंचायत, ॲग्रोवनचे वितरण प्रतिनीधी चेतन सोनवने यांनी परिश्रम घेतले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com