Nashik News: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनंतर आता ६२२ ग्रामपंचायतींवरही प्रशासकांची नियुक्ती होणार आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या या ग्रामपंचायतींचा गाडा आता सरकारी अधिकारी हाकणार असून, नवी कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत गावाच्या ‘चाव्या’ प्रशासकांकडेच राहतील.यामुळे विकासकामांच्या गतीवर मर्यादा येण्याची चिन्हे आहेत..जिल्ह्यात आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक झाल्याने जिल्हा परिषद आणि १५ पंचायत समित्यांच्या निवडणुका आधीच लांबणीवर पडल्या आहेत. सध्या जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकांमार्फत सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता ६२२ ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने तिथेही तीच परिस्थिती असणार आहे. पेठ आणि सुरगाणा हे दोन तालुके वगळता जिल्ह्यातील उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे..Gram Panchayat Fund: सोलापूर जिल्ह्यातील ९७१ गावांना ११५ कोटींचा निधी .उच्च न्यायालयाचे आदेश आणि राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासक नियुक्ती संदर्भात प्रशासकीय यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुका होऊन नवे सरपंच आणि सदस्य निवडून येईपर्यंत हे प्रशासक गावाचे दैनंदिन कामकाज पाहतील. प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी किंवा तत्सम पदांवरील अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा जास्त गावांचा पदभार असल्याने ग्रामविकासाच्या योजनांवर मर्यादा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे..२०२ गावांत मतदारयाद्यांचा कार्यक्रमजिल्ह्यात जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ याकाळात मुदत संपुष्टात आलेल्या १२ तालुक्यांतील २०२ ग्रामपंचायतींमध्ये मतदारयाद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये इगतपुरीच्या ६५, निफाडच्या ३२, बागलाणच्या ३०, त्र्यंबकेश्वर १८, कळवण १४, मालेगाव १२, येवला व नांदगाव प्रत्येकी ८, नाशिक ७, दिंडोरी ४ तर देवळा आणि पेठमधील अनुक्रमे २ व एका गावांचा समावेश आहे. मतदार याद्यांचा कार्यक्रम लक्षात घेता एप्रिल-मेमध्ये या गावांना नवे कारभारी मिळू शकतात..Gram Panchayat Fund: गडचिरोलीत ४४५ ग्रामपंचायतींना मिळाला ९० कोटी रुपयांचा आधार.तालुका संख्याकळवण २९येवला ६८इगतपुरी ०९दिंडोरी ६०त्र्यंबकेश्वर ३सिन्नर १००.निफाड ६५बागलाण ४०चांदवड ५३देवळा ११नांदगाव ६०मालेगाव ९९नाशिक २५एकूण ६२२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.