
Solapur Crime News : मंद्रूप ते कंदलगाव रस्त्यावर चंदन लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती वन विभागास मिळाली.
त्या अनुषंगाने घटनास्थळी जाऊन तत्काळ पाहणी केली असता विना नंबर प्लेट वाहनाद्वारे चंदन लाकूड वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.
२० लाख रुपये किमतीचे चंदन, एक नवीन बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ३० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे यांनी दिली.
मंद्रुप ते कंदलगाव रस्त्यावर चंदन लाकडाची अवैध वाहतूक करताना संशयित आरोपी हिराप्पा परशुराम भोसले, परशुराम हुबळी भोसले (रा. दोघे घाडगेवस्ती, मु.पो. खर्डी ता. पंढरपूर जि. सोलापूर), रमेश चन्नप्पा भोसले (रा. मंगळवार पेठ, परीट गल्ली, मिरज ता. मिरज जि. सांगली- सध्या रा. घाडगेवस्ती मु. पो. खर्डी ता. पंढरपूर जि. सोलापूर) यांना ताब्यात घेतले असून. सदर आरोपीवर वनगुन्हा नोंदविला असून पुढील तपास वनपाल शशिकांत एकनाथ सावंत करीत आहेत.
ही कारवाई उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहायक वनसंरक्षक (रोहयो), लक्ष्मण आवारे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे, वनपाल शशिकांत सावंत, शंकर कुताटे, वनरक्षक तुकाराम बादणे, अनिता शिंदे, गंगाधर कणबस, कृष्णा निरवणे, आनंद भडकवाड, नितीन चराटे पथकाने केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.