Crop Loan : पीककर्जासाठी अडवणूक केल्यास कारवाई

Agriculture Department : उत्तर महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात २६ लाख ८७ हजार ३६ हेक्टरनुसार कृषी विभागाचे पेरणीचे उद्दिष्ट आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon

Nashik Crop Loan Update : उत्तर महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात २६ लाख ८७ हजार ३६ हेक्टरनुसार कृषी विभागाचे पेरणीचे उद्दिष्ट आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पूर्ण अडचणी सापडला आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना कुठलीही अडवणूक न करता पीक कर्ज मिळावे.

बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये. जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना याबाबत सूचना द्याव्यात. जर कोणी शेतकऱ्यांची अडवणूक केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी दिला.

कृषिमंत्री सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. ४) नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप आढावा बैठक पार पडली. त्या वेळी त्यांनी बँकांना इशारा दिला.

कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विभागीय सहसंचालक मोहन वाघ, ‘महाबीज’चे कार्यकारी संचालक सचिन कलंत्री, कृषी संचालक (फलोत्पादन) कैलास मोते, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे, कृषी संचालक (गुणनियंत्रण) विकास पाटील, कृषी संचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन) सुभाष नागरे, कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांबळे, कृषी संचालक (मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन) रवींद्र भोसले, उपायुक्त रमेश काळे उपस्थित होते.

Crop Loan
Crop Loan Update : नाशिक जिल्ह्यासाठी पीककर्जाचा ४२०० कोटींचा लक्ष्यांक जाहीर

सत्तार म्हणाले, की खरीप पीक हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्जासंदर्भात विविध बँकांसोबत बैठका घेऊन पीककर्ज वाटपाचा आढावा घ्यावा.

कृषिमंत्र्यांनी बैठकीत मांडलेले मुद्दे :

- ‘मागेल त्याला शेततळे’या योजनेप्रमाणे कांदाचाळी बाबत लवकरच धोरण

- शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठी आवश्यक त्या प्रमाणात वीजपुरवठा होईल यादृष्टीने विद्युत विभागाने नियोजन करावे.

- प्राधान्यक्रमाने पाणीपुरवठा होण्यासाठी जलसंपदा व जलसंधारण विभागाने पाण्याबाबत योग्य ते नियोजन करावे.

- कृषी विभागाने जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना पीक फेरपालट पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करावे.

- कृषी विभागातील ८० टक्के पदे भरण्याबाबत लवकरच कार्यवाही.

- राज्यात १० हजार हवामान यंत्र करणार कार्यान्वित करणार.

नाशिक विभागाचे जिल्हानिहाय नियोजन

जिल्हा क्षेत्र (हेक्टर)

नाशिक - ६ लाख २७ हजार १४१

अहमदनगर- ६ लाख ४९ हजार ७३०

जळगाव - ७ लाख ५६ हजार ६००

धुळे - ३ लाख ७९ हजार ६००

नंदूरबार - २ लाख ७३ हजार ९६५

एकूण - २६ लाख ८७ हजार ३६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com