Oil Seed : तेलबिया पिकांखालील क्षेत्रवाढ काळाची गरज : चव्हाण

oil Seed production : आपला देश तेल उत्पादनात स्वयंपूर्ण होत आहे. इतर देशांवरील परावलंबित्व आणि आयातीवरील खर्च थांबवत शाश्‍वत शेती व आत्मनिर्भर शेतकरी ही पंतप्रधानांची भूमिका वास्तवात साकारण्यासाठी तेलबिया लागवड वाढ काळाची गरज आहे.
Oil Seed
Oil SeedAgrowon

Akola News : ‘‘आपला देश तेल उत्पादनात स्वयंपूर्ण होत आहे. इतर देशांवरील परावलंबित्व आणि आयातीवरील खर्च थांबवत शाश्‍वत शेती व आत्मनिर्भर शेतकरी ही पंतप्रधानांची भूमिका वास्तवात साकारण्यासाठी तेलबिया लागवड वाढ काळाची गरज आहे.

तसेच शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाचे जाळे निर्माण करण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व इतर सर्वच समांतर संस्थानी एकात्मिक प्रयत्नांची गरज आहे,’’ असे मत कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Agriculture Commissioner Sunil Chavan) यांनी व्यक्त केले.

Oil Seed
Oil Seed : कृषी विद्यापीठ देणार दुबार पीक पद्धतीला प्रोत्साहन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची पूर्व, मध्य व पश्‍चिम विदर्भासाठी ७३ वी सभा झाली. यावेळी श्री. चव्हाण यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते.

अमरावती विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, नागपूर विभागीय कृषी सहसंचालक डॉ. राजेंद्र साबळे, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य हेमलता अंधारे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, कृषी अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई उपस्थिती होते.

डॉ. गडाख म्हणाले,‘‘पारंपरिक शेती पद्धतीमध्ये आंतरपिकांचा समावेश आणि शेतीपूरक व्यवसायाची सक्षम जोड फायदेशीर ठरत आहे.

व्यावसायिक शेतीची संकल्पना अवलंबताना एकात्मिक शेती पद्धती कालसुसंगत आहे. शाश्‍वत शेतीसाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकांची निवड, पिकांची फेरपालट, शेतीपूरक व्यवसायाची सक्षम जोड ही काळाची गरज आहे.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com