Dhule News : हवामानाचे बदलते स्वरूप आणि संभाव्य धोके लक्षात घेता शेतकऱ्यांसह ग्रामीण भागास वेळेत हवामानाची माहिती मिळणे आवश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरु होणार आहे..जिल्ह्याच्या ५५७ पैकी ५१८ ग्रामपंचायतींमध्ये केंद्र सरकारच्या ''विंड'' (वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टिम) प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जाणार आहेत. यात जिल्ह्याचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना अचूक हवामानाविषयी माहिती मिळू शकणार आहे..Automatic Weather Stations : गावागावांत स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार.सरकारच्या या प्रकल्पामुळे अतापर्यंत महसूल मंडळस्तरावर मिळणारी हवामानाविषयी माहिती थेट गावपातळीवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अतिवृष्टी, पूर किंवा गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटांची माहिती गावात मिळू शकेल. या सुविधेमुळे जीवित आणि वित्तहानी टाळता येऊ शकेल. यासंदर्भात कृषी विभागाने कृती आराखडा तयार केला असून, या नवीन ५१८ केंद्रांमुळे जिल्ह्यातील एकूण ५५७ महसूली गावांना हवामानाविषयी अधिकाधिक अचूक माहिती मिळण्याची सुविधा मिळू शकेल..शेतकऱ्यांना मदतसाक्री तालुक्यात १७५, शिंदखेडा ११३, धुळे ११९ आणि शिरपूर तालुक्यात १११ ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जातील. असे स्वयंचलित वेदर स्टेशन चोवीस तास हवामानाच्या निरीक्षणात गुंतलेले असेल. हवामानाच्या अचूक नोंदीमुळे ग्रामीण भागाचे जीवनमान सुरक्षित आणि शेती अधिक शाश्वत होण्यास मदत होऊ शकेल..स्वयंचलित हवामान केंद्रांमधून पावसाचे प्रमाण, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा आदींची माहिती रोज संकलित होईल. शेतकऱ्यांना ही माहिती एसएमएस आणि मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे शेतकरी वर्ग पेरणी, खतांचा वापर, औषध फवारणी आणि सिंचन यासंबंधी निर्णय वेळेत आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने घेऊ शकतील. कीडरोग नियंत्रण आणि बाजारपेठेत नियोजनबद्ध आवक करण्यासाठी या प्रकल्पाची मदत होऊ शकेल..Automatic Weather Station : जालना जिल्ह्यात केवळ ४९ ग्रामपंचायतीमध्ये हवामान केंद्र.वाद, तक्रारी होतील कमीगावपातळीवरील हवामान नोंदी थेट केंद्रीय संगणकीय सर्व्हरवर पाठवल्या जातील आणि प्रशासनाला उपलब्ध होतील. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत नुकसान आणि नुकसानीचा अचूक अंदाज घेणे शक्य होईल. पंचनामे आणि मदत वाटप प्रक्रियेला गती मिळेल. गारपीट किंवा अतिवृष्टीचे इशारे वेळेत मिळाल्यास शेतकरी पिके वाचवण्याची तयारी करू शकतील. .आतापर्यंत केवळ मंडळ पातळीवर पावसाची नोंद होत असल्यामुळे अनेक गावांना त्यांचे झालेले नुकसान सिद्ध करणे कठीण जात होते. गावपातळीवरील अधिकृत आणि प्रमाणित हवामान नोंदी उपलब्ध होणार असल्यामुळे विमा कंपन्यांशी होणारे वाद आणि तक्रारी कमी होऊ शकतील. शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीनुसार शासकीय मदत मिळण्याचा मार्गही सुकर होऊ शकेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.