Minister Dr. Bharti Pawar : कांदा धोरण सुचविण्यासाठी अचूक माहिती द्यावी

कृषी विभाग व बाजार समित्यांनी तयार केलेल्या अहवालात कांदा उत्पादनाबाबत तफावत नसावी. जिल्ह्यात कांदा उत्पादन चांगले असल्याने निर्यात खुली आहे.
Minister Dr. Bharti Pawar
Minister Dr. Bharti PawarAgrowon

Nashik News : जिल्ह्यातील कांद्याचे क्षेत्र व होणाऱ्या उत्पादनाचा अंदाज येण्यासाठी कृषी विभागाने (Agriculture Department) जिल्ह्यातील कांदा पिकाच्या (Onion Crop) एकूण क्षेत्राची माहिती घेण्यासाठी कृषी सहायकांच्या मदतीने गावनिहाय अचूक असा अहवाल तयार करावा, कांदा धोरण सुचविण्यासाठी अचूकता आली पाहिजे. तशा नोंदी घेऊन पुढे कामकाज करता येईल.

सरासरी माहिती न देता अचूक सांख्यिकी देणे अपेक्षित आहे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Minster Dr. Bharti Pawar) यांनी कृषी विभागाला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा दराबाबत आढावा बैठकीत डॉ. पवार बोलत होत्या.

या वेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., सहकार संस्थांचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, ‘नाफेड’चे उप व्यवस्थापक निखिल पाडदे, यांसह विविध शेतकरी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Minister Dr. Bharti Pawar
Onion Rate: राज्यात नाफेड कांदा खरेदी करतच नाही; पवारांची राज्य सरकारवर घणाघाती टीका

डॉ. पवार म्हणाल्या, की कृषी विभाग व बाजार समित्यांनी तयार केलेल्या अहवालात कांदा उत्पादनाबाबत तफावत नसावी. जिल्ह्यात कांदा उत्पादन चांगले असल्याने निर्यात खुली आहे.

कांदा निर्यात करताना निर्यातदारांच्या सूचनेनुसार बंदरावर निर्यातपूर्व शीतकरण प्रक्रियेसाठी प्लगइन पॉईंट वाढविणे, प्रक्रिया उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

या वेळी बैठकीसाठी उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले, की प्रत्येक गावात ८० टक्के कांदा पीक दिसून येत आहे. अजूनही सर्वेक्षण करण्यास वाव असून कृषी विभागाने अंदाज न देता वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी.

कृषी सहायक ग्रामपंचायत कार्यालयात बसून सरासरी माहिती घेतात त्यामुळे मोठा गोंधळ होत आहे. त्यावर अचूक माहितीसाठी पवार यांनी बाब गांभीर्याने घेत कृषी विभागाला सूचना केल्या आहेत.

Minister Dr. Bharti Pawar
Onion Rate : शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पोस्टाने पाठविले कांदे

‘नाफेड’मार्फत करण्यात येणारी लेट खरीप कांदा खरेदी व दर टप्प्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ कांदा खरेदीसाठीदेखील नियोजन करणे आवश्यक आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना येणारा उत्पादन खर्च व त्यानुसार होणारा नफा याअनुषंगाने कांद्याला भाव मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

या बैठकीत कांदा उत्पादक शेतकरी संघटनांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींनी कांदा दर, खरेदी व निर्यात धोरणाबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. जिल्ह्यातील कांदा लागवड क्षेत्राबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी माहिती सादर केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com