Jaljeevan Mission : अकोल्यात ‘जलजीवन’च्या कामांना गती

Groundwater Survey : भूजलस्तर वाढावा या उद्देशाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत सन २०२२-२३ मध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्ह्यातील १० गावांमध्ये ९२ रिचार्ज शाफ्टचे निर्माण करण्यात आले आहे.
Jaljeevan Mission
Jaljeevan MissionAgrowon

Akola News : भूजलस्तर वाढावा या उद्देशाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत सन २०२२-२३ मध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्ह्यातील १० गावांमध्ये ९२ रिचार्ज शाफ्टचे निर्माण करण्यात आले आहे.

पावसाळ्यात या रिचार्ज शाफ्टद्वारे पाणी थेट जमिनीत मुरेल व भूजल पातळीत सुद्धा वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

जिल्ह्यात सतत पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये भूजल स्रोतांचे बळकटीकरण करून पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना नळाद्वारे पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न आहेत.

पावसाच्या पाण्याचे अथवा ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याचे जमिनीत थेट पुनर्भरण करून उथळ व खोल जलधरातील भूजल पातळी वाढविण्याठी व जलस्रोतांच्या बळकटीकरणासाठी रिचार्ज शाफ्ट ही संकल्पना राबविण्यात येते.

Jaljeevan Mission
Groundwater Survey : पेठमध्ये भूजल सर्वेक्षणात त्रुटी; प्रशासनाने काम थांबवले

भूजल पातळीत वाढ व्हावी, शाश्‍वत भूमिगत जलसाठे तयार करून ते उन्हाळ्यात किंवा टंचाईच्या काळात वापरता यावेत हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. याबाबत जनजागृती केल्यानंतर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत सन् २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील १० गावांमध्ये ९२ रिचार्ज शाफ्टची कामे केली आहेत.

अकोला तालुक्यातील तीन गावांत २८, बार्शीटाकळी तालुक्यातील ६ गावांत ५५ व पातूर तालुक्यातील एका गावात नऊ अशी कामे झाली आहेत.

...असे काम करते रिचार्ज शाफ्ट

रिचार्ज शाफ्ट म्हणजे जमिनीवरचे पाणी जमिनीत खोलवर ड्रील मारून खालच्या सच्छिद्र खडकाच्या थरात सोडणे. यात बोअरवेल सारखेच ड्रील केले जाते. या ड्रीलच्या तोंडावर फिल्टर चेंबर बांधून त्यात फिल्टर मीडिया (दगड वाळूची गाळणी) भरतात.

वाळूचे विविध स्तर ओढ्याचे व तळ्यातील पाणी गाळून बोअरवेलमधून खालच्या खडकांमध्ये जाऊन तिथे साठून राहण्यासाठी ही उपाययोजना केली जाते. हेच पाणी भूजल पातळी वाढविण्यास मदत करते. त्यातून आजूबाजूच्या विहिरी, बोअरवेलची पाणी पातळी वाढण्यास मदत होते.

ओढे, तलाव यातील जमिनीवर साठवलेल्या पाण्याचा वापर हा फक्त आजूबाजूच्या शेतकऱ्यांना अधिकाधिक होतो. मात्र रिचार्ज शाफ्टसारख्या उपाययोजनांमुळे जलधर अधिकाधिक भागात पसरत जाऊन दूरपर्यंत पाणी उपलब्ध होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com