Cotton Cultivation : नगर जिल्ह्यातील कापूस लागवडीला वेग

Kharif Season : नगर जिल्ह्यात पावसामुळे खरिपाच्या पेरण्याला वेग आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६१.२५ टक्के पेरण्या झाल्या आहे.
Cotton Cultivation
Cotton CultivationAgrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात पावसामुळे खरिपाच्या पेरण्याला वेग आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६१.२५ टक्के पेरण्या झाल्या आहे. कापसाची सर्वाधिक सरासरीच्या ८० टक्के पेरणी झाली असून एक लाख हेक्टरचा कापूस लागवडीने टप्पा गाठला आहे. महिनाअखेर पेरण्या सरासरी ओलांडतील असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

जिल्ह्यात खरिपाचे ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा साधारणपणे सात लाख हेक्टरवर पेरणी, लागवड होईल असा अंदाज गृहीत धरून कृषी विभागाने नियोजन केले आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक भागांत चांगला पाऊस झाला. मशागती पूर्ण झालेल्या भागात कापूस लागवड, पेरणीला वेग आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात खरिपाची ३ लाख ५५ हजार ११८ हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ६१.२५ टक्के पेरणी झाली आहे.

Cotton Cultivation
Cotton Cultivation: महाराष्ट्रात कापूस लागवड यंदा १५ टक्क्यांनी घटणार

शेवगाव तालुक्यात सर्वाधिक ९०.९३ टक्के पेरणी झाली असून पाथर्डी तालुक्यात ७९ टक्के, नगर तालुक्यात ७४ टक्के, पारनेर तालुक्यात ७३ टक्के, श्रीरामपूर तालुक्यात ६४ टक्के,

Cotton Cultivation
BT Cotton Cultivation : कमी खर्चातील बीटी कपाशी लागवड तंत्रज्ञान

राहुरी तालुक्यात ६९ टक्के पेरणी झाली आहे.

लवकर झालेल्या पावसाचा परिणाम म्हणजे कापसाची लागवड वेगाने सुरू आहे. सरासरीच्या ८० टक्के म्हणजे ९९ हजार हेक्टरवर आतापर्यंत कापूस लावला गेला आहे. शेवगाव तालुक्यात ३९ हजार, पाथर्डी तालुक्यात २९ हजार, नेवासा तालुक्यात २० हजार हेक्टर, कर्जत तालुक्यात सात हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे.

पीकनिहाय पेरणी

भात १,५१६

ज्वारी ०

बाजरी ५५,७२३

नाचणी ३

मका ३४,०३८

तूर ३४,४३४

मूग २५,९३३

उडीद २७,६०६

भुईमूग १४२५

तीळ ३०

कारळे २

सूर्यफूल ६४

सोयाबीन ७४,७३४

कापूस ९८,६८३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com