Rural Development In Roha : रोह्याच्या विकासाला गती

सध्या रोहा नगरपालिकेवर कोणत्याही पक्षाची सत्ता नसून, वर्षाहून अधिक काळापासून येथील कामकाज प्रशासक म्हणून मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण पाहत आहेत.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon

Roha Development News : सध्या रोहा नगरपालिकेवर कोणत्याही पक्षाची सत्ता नसून, वर्षाहून अधिक काळापासून येथील कामकाज प्रशासक म्हणून मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण पाहत आहेत.

असे असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर अलिबाग-मुरूड-रोहा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नाने रोहे शहरातील विविध विकासकामांसाठी सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्यामुळे परत एकदा शहरातील थांबलेल्या विकासकामांना गती मिळणार आहे.

राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसमवेत रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. या निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदे गटातील नेते सक्रिय झाले आहेत.

Rural Development
Rural Development In Nashik : जलसंधारण, सौर पंप वापरात कोनांबे गावचे काय आहे ‘रोल मॉडेल’?

शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे, अल्पसंख्याक विभागप्रमुख उस्मान रोहेकर, शहरप्रमुख मंगेश रावकर आदींनी आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेऊन शहरातील विकास कामांविषयी चर्चा केली.

त्यानंतर दळवी यांनी रोहा शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले होते.

मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत रोहा शहरातील धनगर आळी, अंधार आळी, नाना शंकर शेठ रोड, रायकर पार्क, रोहा खालचा मोहल्ला, मिल्लत (सुंदर) नगर, अष्टमी येथील रस्ते काँक्रीटीकरण, रस्ते डांबरीकरण, आर.सी.सी. गटार, मल्हार चौक येथील गार्डन आणि अहिल्यादेवी चौक सुशोभीकरणासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शहरातील श्री धावीर मंदिरापासून मिल्लतनगरपर्यंत भागातील रहिवासी विकास कामांपासून वंचित होते. आता भागासाठी तब्बल १ कोटी रुपये आणि खालचा मोहल्ला विभागातील अंतर्गत रस्ते कामासाठी ३० लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
उस्मान रोहेकर, अल्पसंख्याक, विभागप्रमुख

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com