Vegetable Cultivation: डोंगराच्या कुशीत वसलेले भाजीपाल्याचे गाव

गेल्या कित्येक वर्षांपासून बोअरवेलच्या पाण्यावर या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्तम प्रकारे भाजीपाला लागवड करून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध केले आहे.
Vegetable
VegetableAgrowon
Published on
Updated on

Palghar News : वाडा तालुक्यातील देवघर हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बोअरवेलच्या पाण्यावर या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्तम प्रकारे भाजीपाला लागवड (Vegetable Cultivation) करून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध केले आहे. त्यामुळे या गावाला भाजीपाला उत्पादक म्हणून नवी ओळख मिळते आहे.

देवघर गाव डोंगर-दऱ्याच्या पायथ्याशी वसलेले असल्याने येथे मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे देवघरबरोबरच बुधावली, गुंजकाटी या गावातीलही तरुण शेतकऱ्यांनी मिरची, टोमॅटो, भेंडी, कारली, वांगे, कोबी, फ्लॉवर, पालेभाज्या, कोथिंबीर, सूर्यफूल इत्यादी लागवड करून मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन (Vegetable Cultivation) घेत आहेत.

Vegetable
Vegetable Production : बारमाही गुणवत्तापूर्ण भाजीपाला उत्पादन

त्याचबरोबर कलिंगड, टरबूज, झेंडूही मोठ्या प्रमाणात पिकवले जात आहेत. जुन्याजाणत्या शेतकरी माहितगारांकडून माहिती घेऊन त्या पद्धतीने शेती केली जात असल्याने उत्पन्न व मालाला भाव मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आम्ही वडिलोपार्जित भाजीपाला शेती करीत आहोत. यामध्ये चांगले उत्पन्न मिळत असल्याने आमची आर्थिक परिस्थिती हळूहळू बदलत चालली आहे. शेती हा व्यवसाय चांगला असून यामध्ये कष्ट, सातत्य आणि मेहनत महत्त्वाची आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात न फिरता शेती फायदेशीर ठरते.
अनिकेत पाटील, तरुण शेतकरी, देवघर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com