Aamras Party : आंब्याच्या रसाचा अख्ख्या गावाला पाहुणचार

Mango Season : कुटुंबाची आमराई! या आमराईतील फळांच्या रसाची चव गावातील प्रत्येकाला चाखता यावी याकरिता पठाडे कुटुंबीयांनी अख्ख्या गावाला रस, पुरणपोळीची मेजवानी देण्याचा निर्णय घेतला.
Aamras Party
Aamras PartyAgrowon

Yavatmal News : कुटुंबाची आमराई! या आमराईतील फळांच्या रसाची चव गावातील प्रत्येकाला चाखता यावी याकरिता पठाडे कुटुंबीयांनी अख्ख्या गावाला रस, पुरणपोळीची मेजवानी देण्याचा निर्णय घेतला. १५० वर्षांपूर्वी या उपक्रमाची सुरुवात झाली आणि आजही ती परंपरा कायम सुरू आहे.

आर्णी तालुक्यातील लिंगा सायखेडा हे जेमतेम साडेतीनशे लोक वस्तीचे गाव. गावातील सधन कास्तकार म्हणून शिवराम पठाडे यांची ओळख होती. पठाडे यांच्या बागेत मोठ्या संख्येने आंब्याची झाडे होती.

Aamras Party
Mango Export : कृषी अधिकाऱ्यांच्या तत्परतेने रात्रीतूनच आंबा पोहोचला लंडनला

साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी याच आंबा बागेतील काही झाडांची आंबे काढत त्यापासून रस करून काही प्रतिष्ठित तसेच गावातील नागरिकांना निमंत्रित करून त्यांना पाहुणचार द्यावा का, असा विचार शिवराम पठाडे यांच्या मनात आला. त्यांनी कुटुंबीयांना हा विचार सांगितला.

सर्वांनी त्यावर सहमती दर्शवली आणि त्या दिवसापासून दरवर्षी मे महिन्यात संपूर्ण गावासह काही निमंत्रितांना पुरणपोळी, आंब्याचा रस, वांग्याची भाजी, भात, भरडा, कुरडया, पापड अशा पदार्थांचा पाहुणचार दिला जातो.

Aamras Party
Mango Farming : आंब्याचा दर्जा राखण्यावर भर

शिवराम पठाडे यांच्यानंतर त्यांच्या चौथ्या पिढीने देखील ही परंपरा कायम राखली आहे. लिंगी सायखेडा येथील वाड्यात हा पाहुणचार दिला जातो. बाबाराव पठाडे यांची चौथी पिढी अवधूत, प्रमोद, विनोद, सौ. रंजना, सौ. शीतल, सात्त्विक, आरव, अर्णव, प्रणव, मंदार हे देखील त्याच उत्साहात हा सोहळा साजरा करतात.

कधीकाळी सासरी गेलेल्या गावातील मुली देखील त्यांच्या पतीसोबत या स्नेह भोजनात सहभागी होत होत्या. माहेरी रसासाठी येण्याचा हा अविस्मरणीय योग या माध्यमातून साधला जात होता. त्या माध्यमातून सर्वांच्या भेटीगाठी होत खुशाली विचारणे शक्य होत होते. दीडशे वर्षांपासून आजही हा आनंदाचा सोहळा पठाडे पाटील कुटुंबीय साजरा करतात. या सोहळ्यात ग्रामस्थ छोट्या-मोठ्या कामाच्या माध्यमातून सहकार्याची भूमिका बजावतात.

माझे आजोबा शिवरामजी पठाडे पाटील यांनी दीडशे वर्षांपूर्वी परंपरा सुरू केली होती. त्यानंतर माझे वडील गुलाबराव पठाडे यांनी यात सातत्य राखले. आज माझे वय ८५ वर्षे आहे मी माझ्या संपूर्ण आयुष्यात ही परंपरा जपली त्यानंतर आता माझी मुले अवधूत, प्रमोद, विनोद यांनी या उपक्रमात सातत्य ठेवले आहे.
- बाबाराव पठाडे पाटील, लिंगी सायखेडा, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com