Nashik News: नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून तापमानात वाढ होऊन थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. त्यातच येवला व बागलाण तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान आहेच. त्यातच झालेल्या पावसामुळे काढणीला केलेला कांदा पावसात भिजला तर वातावरातील बदलांमुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे..पिकांसाठी हे वातावरण प्रतिकूल असून अगोदरच द्राक्षबागा अडचणीत असून त्यात भर पडण्याची शक्यता आहे. तर काढणीला आलेला खरीप लाल कांदा पावसात भिजल्याने सडण्याची भीती आहे. तसेच नवीन लागवड केलेल्या कांद्यावर ‘करपा’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अस्मानीचे संकट शेतकऱ्यांवर असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तीन दिवसांपूर्वी येवला तालुक्याच्या पूर्व भागांत परिसरात पावसाने हजेरी लावली होती. तर मंगळवारी (ता. ६) सायंकाळी बागलाण तालुक्यात झालेल्या पावसामुळे काढणीस आलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली..Climate Change Impact: बदललेले वातावरण उशिरा छाटलेल्या बागांसाठी पोषक.करंजाडी खोरे, काटवन भागातील शेतकरी संकटातबागलाण तालुक्यातील करंजाडी खोरे व काटवन भागातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला. मंगळवारी (ता. ६) सायंकाळी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पडले. करंजाडी खोऱ्यातील बिजोटे, आखतवाडे, आनंदपूर, गोराणे, कोटबेल आदी गावांना पावसाने झोडपून काढले. तर काटवन भागातील बिलपुरी, बोढरी, चिराई, महड आदी गावांमध्येही शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. कांदा, हरभरा, द्राक्ष बागा तसेच लागवडीसाठी केलेल्या कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले आहे..Climate Change Impact: ढगाळ वातावरणाचा जिल्ह्यात रब्बी पिकांवर परिणाम.अचानक अवकाळी पाऊस झाला. काढलेला कांदा पूर्णपणे भिजला. तीन एकर पावसाळी कांदा काढणीयोग्य असूनही खराब झाला. एक एकर कांदा पावसात भिजून गेला. नवीन तयार केलेले उन्हाळ कांद्याचे क्षेत्र व लावणीसाठीची रोपेही पावसामुळे भुईसपाट झाली आहेत. सरकारकडून हमीभाव मिळत नाही आणि निसर्गही शेतकऱ्याला जगू देत नाही. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने दिलासा द्यावा.- प्रदीप खैरनार, युवा शेतकरी, कोटबेल, ता. बागलाण.अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत कृषी विभागाकडून अहवाल घेऊन वरिष्ठ कार्यालयात सादर केला जाईल.- कैलास चावडे, तहसीलदार, बागलाण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.