Chandrapur Flood : चंद्रपूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा होणार अभ्यास

Chandrapur Rain : चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थितीबाबत अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय योजना सुचविण्यात येणार आहेत.
Flood
Flood Agrowon

Chandrapur Flood News : जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई नद्या व त्यांच्या उपनद्यांना येणाऱ्या पुराचा फटका शहरातील अनेक प्रभागांतील नागरिकांना बसत आहे. पूरपरिस्थितीचा सामना आता दरवर्षीच करावा लागत आहे.

त्यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. पूरपरिस्थितीला कारणीभूत घटक, कायमस्वरूपी उपाययोजना आदी बाबींवर ही समिती काम करेल. त्यानंतर महिनाभरात समिती जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार आहे.

Flood
Irai Dam : इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले ;चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती; प्रशासन अलर्ट मोडवर

पावसाळ्यात चंद्रपूर शहरासह अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होत असते. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा, वैनगंगा, पैनगंगा व इरई या मुख्य नद्यांना व त्यांच्या उपनद्यांना येणाऱ्या पुराचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

नद्या व त्यांच्या पाणलोट क्षेत्रात होणारी अतिवृष्टी, नद्यांवरील धरणामधून सोडला जाणारा विसर्ग याचा एकत्रित परिणाम होऊन जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होत आहे.

Flood
Chandrapur Water Issue : चंद्रपूर जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टर क्षेत्र तहानलेले

सदर पूर परिस्थितीस नैसर्गिक घटकासोबतच मानवनिर्मित घटकही कारणीभूत आहेत. आतापर्यंत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीला कारणीभूत घटकांचा अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना केल्यास भविष्यात पुरामुळे होणारे नुकसान टाळणे शक्य होणार आहे.

त्यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभ्यास समिती स्थापन करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

या समितीत सचिव म्हणून पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, तर सदस्य म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त, चंद्रपूर महाऔष्णिक वीजकेंद्राचे मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, चंद्रपूर, वणी, माजरी, बल्लारपूर वेकोलीचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक (स्थापत्य विभाग), चंद्रपूर-बल्लारपूर रेल्वेस्थानकाचे व्यवस्थापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, अशासकीय सदस्य पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ, सचिव, सदस्य म्हणून पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचा समावेश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com