One Guntha Act: रहिवाशी क्षेत्रात एक गुंठा जमिनीचा तुकडा पाडता येणार : बावनकुळे

Chandrashekhar Bavankule Statement: रहिवाशी क्षेत्रात एक गुंठा जमिनीचा तुकडा अधिकृतरीत्या पाडण्यास कायदेशीर मान्यता देणारे विधेयक पावसाळी अधिवेशनात सादर होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्ली येथे ही माहिती दिली.
Chandrashekhar Bavankule
Chandrashekhar BavankuleAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: रहिवासी क्षेत्रामध्ये एक गुंठा जमिनीचा तुकडा पाडता येईल, असा कायदा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आणू, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

श्री. बावनकुळे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये तुकडे बंदी कायद्याची सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महसूल विभाग सुधारणेचे पुढचे पाऊल टाकतो आहोत.

Chandrashekhar Bavankule
Chandrashekhar Bavankule : उद्योजक-राजकारणी यांच्या संबंधात गैर काय?

राज्यात महायुती सरकार आल्यानंतर महसूल खात्यामध्ये जवळपास महत्त्वाचे १७-१८ निर्णय आम्ही घेतले. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. अधिवेशनात वन स्टेट वन रजिस्ट्रेशन, व्हर्टिकल स्वामित्व देण्याबाबत प्रयत्न करणार आहोत.’’

ते पुढे म्हणाले, की केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या भेटीस मी दिल्ली येथे आलो होतो. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एनटीपीसी प्रकल्पात कुंभारी गावाचे पुनर्वसन व्हावे. शेती संपादन केली त्याचपद्धतीने घरांचे पुनर्वसन झाले पाहिजे. या बाबत खट्टर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी हा दौरा होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com