थोडक्यात माहिती..१. हिरवा चारा कमी असताना मुरघास हा उत्तम पर्याय आहे.२. मका दाणे दुधाळ अवस्थेत किंवा ज्वारी फुलोऱ्यावर असताना कापून कुट्टी करावी.३. कुट्टी खड्ड्यात भरताना हवा राहू नये म्हणून दाबून भरावे.४. गुळाचे पाणी (१-१.५%) + युरिया (१%) मिसळून फवारल्यास चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होतो.५. ४५-६० दिवसांनी वापरता येतो; दुभत्या जनावरास रोज १०-१५ किलो मुरघास द्यावा..Animal Care: साधारणपणे आपल्याकडे फक्त पावसाळ्याच्या ३ ते ४ महिन्यातच हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. पण बाकीच्या ८ ते ९ महिने हिरव्या चाऱ्याची कमतरता भासते. या अडचणीवर मुरघास हा रामबाण उपाय आहे. मका, ज्वारी इत्यादी अशा एकदल पिकांच्या हिरव्या चाऱ्यापासून मूरघास करता येतो. मूरघास तयार करायला सोपा असतो आणि कमी खर्चात तो बनतो..मूरघास तयार करण्याची पद्धत मक्याचे पीक पोटरीवर येऊन दाणे दुधाळ असताना कापावे. तर ज्वारी किंवा बाजरीचे पीक फुलोऱ्यावर असताना कापावे. कापलेल्या पिकाचा कुट्टी यंत्राच्या सहाय्याने चाऱ्याची कुट्टी करून खड्ड्यामध्ये भरावी. खड्डा भरत असताना वरून दाब देत रहावा. त्यामुळे खड्ड्यात हवा भरणार नाही. .Agriculture Technology: उत्तम मुरघास निर्मितीसाठी यंत्रे.खड्ड्यामध्ये हवा राहिल्यास चारा कुजण्याची शक्यता असते.चांगल्या प्रतीचा मूरघास तयार करण्याकरीता कुट्टी केलेल्या चाऱ्यावर त्याच्या प्रमाणाच्या १ ते १.५ टक्के गुळाचे पाणी, आणि १ टक्का युरिया पाण्यात मिसळून फवारावा.खड्डा पूर्ण भरल्यानंतर खड्ड्याच्या वरच्या भागावर १ ते २ फूट उंच वैरणीचा निमूळता ढीग करावा आणि त्यावर गवत किंवा कडब्याच्या पेंढ्याचा थर पसरावा..त्यानंतर शेण व चिखल यांच्या मिश्रणाचा थर देऊन खड्डा झाकून टाकावा.या खड्ड्यावर पॉलिथिन पेपर म्हणजेच प्लास्टिकचा पेपर अंथरण्यास हरकत नाही. मूरघास तयार होण्यास ४५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो.त्यानंतर खड्ड्याच्या तोंडास थोडेसे भोक पाडून त्यातून रोज मूरघास काढून घ्यावा. मूरघास काढून घेतल्यानंतर त्यावर वाळलेले गवत वगैरे घालून तोंड बंद करावे..दुभत्या जनावरास दररोज १० ते १५ किलो मूरघास खाऊ घालावा.मूरघास हा आंबट गोड चारा असतो. त्यामुळे जनावरे तो आवडीने खातात.पावसाळी हंगामात जादा असलेल्या ओल्या वैरणीचा मूरघास तयार करून तुटीच्या काळात दुभत्या जनावरांना तो खाऊ घालावा..वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):१. मुरघास कोणत्या पिकांपासून तयार होतो? मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या एकदल पिकांच्या हिरव्या चाऱ्यापासून.२. मुरघास तयार होण्यास किती दिवस लागतात? साधारण ४५ ते ६० दिवस.३. मुरघास खड्ड्यात हवा गेल्यास काय होते? चारा कुजतो व त्याची गुणवत्ता खराब होते.४. मुरघास जनावरांना किती द्यावा? दुभत्या जनावरास दररोज १० ते १५ किलो.५. मुरघासाची चव कशी असते? आंबट-गोडसर असल्यामुळे जनावरे आवडीने खातात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.