Pune News: ‘‘राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (एफपीसी) चळवळीला बळ देण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार केले जाईल. तसेच या कंपन्यांच्या मदतीसाठी सरकारी पातळीवर पालक यंत्रणा उभारण्याचा विचार करण्यात येईल,’’ अशी घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली..हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल येथे शनिवारी (ता. ६) आयोजित केलेल्या ‘सकाळ अॅग्रोवन’च्याो तिसऱ्या एकदिवसीय राज्यस्तरीय एफपीसी महापरिषदेचे (एफपीसी लीडरशिप कॉन्क्लेव्ह) उद्घाटन करताना ते बोलत होते. सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, पारादीप फॉस्फेट्स लिमिटेडचे अध्यक्ष व सीसीओ हर्षदीप सिंग या वेळी व्यासपीठावर होते..या महापरिषदेचे मुख्य प्रायोजक पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड होती. ती पॉवर्ड बाय महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस प्रकल्प (मॅग्नेट) पुणे होती. तसेच ॲडव्हान्स्ड बायो-ॲग्रो टेक लिमिटेड (एबीटीएल), ऊर्ध्वम एन्व्हायर्न्मेंटल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, शेतीपूरक ॲग्रोटेक अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड व कोठारी ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड हे सहप्रायोजक होते..श्री. भरणे म्हणाले, ‘‘एफपीसी संकल्पनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी आत्मविश्वासाने कृषी व्यवसायात उतरत आहेत. शेती परवडत नाही, अशी पारंपरिक मानसिकता आपण सोडायला हवी. शेती परवडते आणि आम्ही ती यशस्वीपणे करणार, असा निर्धार आपण करायला हवा..एफपीसींसाठी ‘अॅग्रोवन’ने मांडलेले प्रश्न शासनाने विचारात घेतले आहेत. मी स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव आहे. कृषिमंत्री म्हणून मी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या पाठीशी उभा राहीन.’’.FPC Conclave 2025: राज्यात 'एफपीसी'साठी स्वतंत्र धोरण, यंत्रणा तयार करु- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे .आव्हाने तेथेच संधी : विलास शिंदेश्री. शिंदे यांनी राज्यात २४ हजार शेतकरी कंपन्या असून त्यातील जेमतेम दीड हजार सक्रिय असल्याचा उल्लेख करीत, ही वाईट स्थिती बदलायला हवी, असा आग्रह धरला. ते म्हणाले, ‘‘२००२ ते २०१२ या एका दशकात एफपीसी चळवळीला कोणीही समजून घेतले नाही. २०११ मध्ये आमची सह्याद्री कंपनी आली. परंतु, आम्ही एकदम मोठे झालेलो नसून आमचा प्रवास प्रचंड संघर्षातून झाला आहे. शेतकऱ्यांसमोर सतत मोठी आव्हाने असतात. ही आव्हानेच संधीदेखील आणतात. शेतीत जोखीम आहे व तेथेच नफादेखील आहे. त्यामुळे शेतकरी कंपन्यांनी आव्हाने, जोखीम पेलण्यास पुढे यावे.’’.अटी-नियमांच्या बेड्यांतून मुक्त : आदिनाथ चव्हाणप्रास्ताविकात श्री.चव्हाण म्हणाले, ‘‘शासन एका बाजूला बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी पायघड्या घालते आहे; मात्र शेतकऱ्यांच्या कंपन्यांसाठी देखील पायघडीचा एक छोटासा तुकडा शासनाने द्यायला हवा. शेतकरी कंपन्यांना किचकट अटी-नियमांच्या बेड्यांतून मुक्त करायला हवे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केवळ शेतीमाल खरेदीमध्ये अडकून न पडता शेतीमालाच्या मूल्यसाखळीत काम करायला हवे. एफपीसींसाठी राज्य सरकारने स्वतंत्र धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे.’’.FPC Loan Proposal: ‘एफपीसीं’चे कर्जप्रस्ताव बॅंकांनी रखडवले .एफपीसी चळवळ मार्गदर्शक : हर्षदीप सिंग‘‘एफपीसी वाटचालीत तसेच प्रयोगशील शेतीत महाराष्ट्रात सुरू असलेले काम मार्गदर्शक आहे,’’ असे गौरवोद्गार श्री. सिंग यांनी काढले. ‘‘अथक श्रमातून या देशाला अन्नधान्यात आत्मनिर्भर बनविणारा शेतकरीच आज खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र आहे. भारतीय शेतीसमोरील आता सर्वांत मोठे आव्हान उत्पादन नसून, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य दाम कसा मिळेल, हे आहे. त्यासाठी बाजार संलग्नता वाढविली पाहिजे. हे काम एफपीसी चळवळ करते आहे,’’ असे ते म्हणाले..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जतीन पांडे यांनी केले, तर अॅग्रोवनचे सरव्यवस्थापक बाळासाहेब खवले यांनी आभार मानले. या महापरिषदेला राज्यातील आघाडीच्या निवडक शेतकरी उत्पादक कंपन्यांचे निमंत्रित प्रतिनिधी उपस्थित होते. त्यात महिलांचाही समावेश होता. परिषदेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद लाभला. दिवसभरातील चर्चासत्रांमध्ये बाजारपेठेतील संधी, शाश्वत बिझनेस मॉडेल्स, वित्तपुरवठा, एफपीसींच्या यशोगाथा, धोरणात्मक मुद्दे, आव्हाने आणि संधी याविषयी अभ्यासपूर्ण मंथन झाले..‘कर्जमाफी ३० जूनपूर्वीच होणार’राज्यातील अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने आतापर्यंत २८ शासन निर्णय (जीआर) काढून २० हजार कोटींची मदत केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. त्याबाबत नेमलेल्या परदेशी समितीचा अहवाल येत्या एप्रिलमध्ये सादर होईल. त्यानंतर ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल,’’ अशी माहिती श्री. भरणे यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.