Sugarcane Variety : उसाची नवीन जात : एमएस १४०८२

एमएस १४०८२ (फुले ऊस १३००७) ही जात ऊस आणि साखर उत्पादनात को ८६०३२ पेक्षा चांगली आहे. सुरू, पूर्व आणि आडसाली हंगामासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे. खोडव्याचे देखील चांगले उत्पादन मिळते.
Sugarcane Variety
Sugarcane VarietyAgrowon

डॉ. भरत रासकर, डॉ. रामदास गारकर, डॉ. माधवी शेळके

एमएस (MS) १४०८२ (फुले ऊस १३००७) या मध्यम पक्वतेच्या जातीची निर्मिती फुले २६५ आणि कोएम ०२५४ या जातीच्या संकरातून करण्यात आली आहे. या जातीची शिफारस महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांत लागवडीसाठी करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय उत्पादन ः

राज्यस्तरीय चाचण्यांमध्ये सुरू हंगामात हेक्टरी १२९ टन, पूर्वहंगामात १३६ टन, आडसाली १४७ टन आणि खोडवा उत्पादन हेक्टरी १२१ टन मिळाले. साखर उत्पादन अनुक्रमे हेक्टरी १८.४४, १९.४०, २०.५३ आणि १७.१० टन मिळाले.

हे ऊस उत्पादन तुलनात्मक जात को ८६०३२ पेक्षा सुरू, पूर्वहंगामी, आडसाली आणि खोडवामध्ये अनुक्रमे ८.७२, १३.०० ९.१४ आणि ११.२२ टक्के आणि साखर उत्पादन ९.०५, १०.९८, ६.१० आणि १०.२५ टक्के अधिक मिळाले.

एमएस १४०८२ या जातीचे व्यापारी शर्करा प्रमाण सुरू, पूर्वहंगामी, आडसाली आणि खोडवा अनुक्रमे १४.२२, १४.१९, १३.९५ आणि १४.०२ टक्के मिळाले.

एमएस १४०८२ जातीचे राज्यस्तरीय चाचणीत हेक्टरी ऊस व साखर उत्पादन. (टन)

द्विकल्पी विभागात उसाचे उत्पादन ः

अंतिम चाचणीमध्ये तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ आणि महाराष्ट्रात राज्यातील १२ ठिकाणी एमएस १४०८२ या जातीचे उत्पादन को ८६०३२, कोसी ६७१, कोएसएनके ०५१०३ या प्रचलित जातीपेक्षा अनुक्रमे ११.२२, २९.७० आणि १९.७८ टक्के अधिक मिळाले.

खोडव्याचे ऊस आणि साखर उत्पादन को ८६०३२ पेक्षा अनुक्रमे १०.८७ टक्के आणि १२ टक्के अधिक मिळाले. ही जात १२ ठिकाणी साखर आणि ऊस उत्पादनात पहिली आली.

Sugarcane Variety
Sugarcane Crop : उस खोडवा ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवा

एमएस १४०८२ जातीचे सहा राज्यातील अंतिम चाचणीत हेक्टरी ऊस उत्पादन (टन) (२०१९-२० व २०२०-२१)

एमएस १४०८२ जातीचे सहा राज्यातील अंतिम चाचणीत हेक्टरी व्यापारी साखर उत्पादन (टन) (२०१९-२० व २०२०-२१)

एमएस १४०८२ जातीचे सहा राज्यांतील अंतिम चाचणीत रसातील सुक्रोज प्रमाण (टक्के) (२०१९-२० व २०२०-२१)

द्विकल्पीय विभागात उत्पादन वाढ घटकांचा अभ्यास ः

उसाचा सरासरी व्यास, उसाची कांड्यापर्यंत सरासरी उंची, उसाची हेक्टरी संख्या आणि उसाचे सरासरी वजन याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये एमएस १४०८२ या जातीच्या उसाचा सरासरी व्यास २.८० सेंमी मिळाला. हा व्यास को ८६०३२ पेक्षा अधिक दिसून आला.

उसाची सरासरी उंची (सेंमी) मध्ये एमएस १४०८२ या जातीची उंची २६६ सेंमी मिळाली. ही उंची को ८६०३२ पेक्षा अधिक आहे. एका उसाच्या सरासरी वजनामध्ये एमएस १४०८२ जातीचे वजन १.५३ किलो मिळाले. हे वजन को ८६०३२ पेक्षा जास्त आढळून आले.

Sugarcane Variety
Sugarcane Harvesting : मशिनचालकांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक

पाण्याच्या ताणाचा उत्पादनावर परिणाम ः

एमएस १४०८२ या जातीची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आणि नियमित पाणी यांचा अभ्यास प्रचलित जातींसोबत करण्यात आला. यामध्ये एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात पाणी थांबविण्यात आले. त्यानंतर नियमित पाणी दिले.

याबाबत उत्पादनाची आकडेवारी पाहिली असता नियमित पाण्यापेक्षा उत्पादनात १६ टक्के आणि साखर उत्पादनात १३.९८ टक्के घट आली. यावरून या जातीमध्ये पाण्याचा ताण सहन करणची क्षमता असल्याचे दिसून आले.

एमएस १४०८२ जातीचे सहा राज्यांतील अंतिम चाचणीत उत्पादन वाढ घटकांचा आढावा (२०१९-२० व २०२०-२१)

एमएस १४०८२ जातीची पाण्याचा ताण सहन करण्याच्या उत्पादनावर परिणाम.

एमएस १४०८२ जातीची वैशिष्टे ः

१) ऊस आणि साखर उत्पादनात को ८६०३२ पेक्षा चांगली जात. सुरू, पूर्व आणि आडसाली हंगामासाठी शिफारस.

२) कांडाचा रंग हिरवा, पाचट निघाल्यानंतर रंग पिवळसर हिरवा, उंच वाढणारी, शंक्वाकृती नागमोडी कांडी, मध्यम आकाराचा अंडाकृती डोळा, डोळ्यापुढे खाच नाही.

३) मध्यम रुंदीची सरळ वाढणारी गर्द हिरवी पाने, पानावर कूस नाही, पाचट सहज निघते.

४) मध्यम जाडीचा दशी न पडणारा ऊस, संख्या जास्त, चांगला खोडवा, लालकूज, काणी, मर, पिवळा पानांच्या रोगास प्रतिकारक्षम, तांबेरा, तपकिरी ठिपके, पोक्का बोइंग रोगांना प्रतिकारक.

५) खोड कीड, कांडी कीड व लोकरी मावा किडींना कमी बळी पडणारी जात.

६) क्षारयुक्त जमिनीतही उगवण आणि उत्पादनक्षम, तुऱ्याचे कमी प्रमाण.

संपर्क ः ०२१६९-२६५३३८ (मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com