Cotton New Variety : आता बीटी कपाशीमध्येही सरळ वाण; परभणीच्या कृषी विद्यापीठाचे संशोधन

straight variety of BT cotton : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राने कपाशीचे तीन बीटी सरळ वाण विकसीत केले आहेत.
Cotton New Variety
Cotton New Variety Agrowon

Cotton straight variety : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राने कपाशीचे तीन बीटी सरळ वाण विकसीत केले आहेत.   आता या वाणामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होईल तर कपाशीच्या सरळ वाणांमध्ये बीटी तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केल्‍यामुळे शेतकऱ्यांचा बियाण्यांवर होणारा खर्च कमी होण्‍यास मदत होईल. याशिवाय हे वाण कोरडवाहू क्षेत्रातही उत्पादनात सातत्य ठेवणार आहे.  या वाणामुळे बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचे खासगी कंपन्यांवर अवलंबून राहाव लागत होतं. या वाणामुळे शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध होणार आहे. असा विद्यापीठाने दावा केला आहे. या वाणामुळे काय फायदे होणार आहेत आणि या वाणाची खास वैशिष्ट्ये काय आहेत याची माहिती मी तुम्हाला या व्हि़डीओतून सांगणार आहे. 

संकरित वाणाच्या तुलनेत कपाशीच्या सरळ वाणांचा लागवड खर्च कमी आहे. कारण सरळ वाणाची एकदा लागवड केल्यानंतर त्याच बियाण पुढे तीन वर्षापर्यंत वापरता येत. याशिवाय खतेही कमी प्रमाणात लागतात. त्यामुळे कपाशीच्या सरळ वाणाची शेतकऱ्यांकडून मागणी होत असली तरी वाण उपलब्ध नसल्यामुळे राज्यात जास्तीत जास्त संकरित कपाशीची लागवड होऊ लागली. ही गरज लक्षात घेऊन ६ वर्षाच्या संशोधनातून नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राने कपाशीचे ‘एनएच १९०१ बीटी’, ‘एनएच १९०२ बीटी’ आणि ‘एनएच १९०४’ हे तीन बीटी अमेरिकन सरळ वाण विकसीत केले. केंद्रीय वाण निवड समितीच्या नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत या वाणांना नुकतीच मान्यता मिळालीय.

Cotton New Variety
BT Cotton Variety Selection : कसं असावं बीटी कपाशीचे वाण?

महाराष्‍ट्र, गुजरात, मध्‍यप्रदेश राज्‍यासाठी या वाणांची शिफारस करण्यात आली आहे.   कपाशीचे सरळ वाण बीटी तंत्रज्ञानात रुपांतरित करणारे परभणी कृषी विद्यापीठ हे राज्‍यातील पहिले कृषी विद्यापीठ ठरले आहे.  या पुर्वी असा प्रयोग नागपुरच्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्राने केला होता.  हे वाण आता येत्या वर्षात शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध होणार आहे.  

तर परभणी येथील महेबुब बाग कापूस संशोधन केंद्राने ‘पीए ८३३’ हे देशी कपाशीचे सरळ वाण विकसीत केलय.  जे दक्षिण भारतासाठी शिफारस करण्यात आलय.

आता पाहुया या वाणाची वैशिष्ट्ये काय आहेत ते... 
कपाशीच्या या सरळ बिटी वाणांना रासायनिक खतांची गरज संकरित वाणा पेक्षा कमी लागते. हे वाण कापूस उत्पादनासाठी तुल्यबळ वाणापेक्षा म्हणजेत चेक वाणापेक्षा सरस ठरले आहे. रसशोषक किडी, जीवाणूजन्य करपा आणि पानावरील ठिपके या रोगांकरिता हे वाण सहनशील आहे .या वाणाचा रुईचा उतारा ३५ ते ३७ टक्के आहे. तर धाग्यांची लांबी मध्यम आहे. मजबुती व तलमपणाही चांगला आहे. ‘एनएच १९०१ बीटी’ या वाणाचा रुईचा उतारा ३७ टक्के आहे. हे वाण सघन लागवडीसाठीही उत्तम आहे, असा विद्यापीठाचा दावा आहे.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अॅग्रोवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरु नका.

माहिती आणि संशोधन - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com