Team Agrowon
वाण निवडताना जमिनीची पोत, लागवडीचा प्रकार व वाणाचे गुणधर्म यांचा विचार करावा.
अधिक उत्पादनक्षम तसेच बोंडगळ व बोंडसड कमी प्रमाणात होणारा वाण असावा.
रस शोषण करणाऱ्या किडींना प्रतिकारक्षम व रोगांना बळी न पडणारा संकरित वाण असावा.
पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा.
धाग्याची प्रत चांगली असणारा आणि बोंडे चांगली फुटणारा वाण निवडावा.
बोंडाचा आकार कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम तर बागायती लागवडीसाठी मोठा असणारा वाण निवडावा.
गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून लवकर वेचणीसाठी तयार होणारा वाण निवडावा.