Sant Tukaram Maharaj Palkhi : पालखीमार्ग सुखकर होण्याच्या दिशेने वाटचाल

Palkhi Mahamarg : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे माळशिरस तालुक्यात होणाऱ्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर या पालखी महामार्गाच्या कामाने वेग घेतला आहे.
Palkhi mahamarg
Palkhi mahamarg Agrowon

Sant Tukaram Maharaj Palkhi : लवंग : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे माळशिरस तालुक्यात होणाऱ्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर या पालखी महामार्गाच्या कामाने वेग घेतला आहे.

मुरूम टाकणे, रोलिंग करणे, खडी टाकून रोलिंग करून डांबरीकरण करणे ही कामे युद्धपातळीवर चालू असल्याने पालखी सोहळ्याचा मार्ग सुखकर होण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे.

Palkhi mahamarg
Pune News : पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीचे कामे पूर्ण करा

माळशिरस तालुक्यात २२ किलोमीटरचा असलेला हा श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग पंचवटी, माळीनगर, गट नंबर दोन, महाळुंग, बोरगाव, माळखांबी गावातून जातो.

सोहळा जिल्ह्यात प्रवेश करताच अकलूज येथे गोल रिंगण होते आणि दुसऱ्या दिवशी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण माळीनगरमध्ये रस्त्यावर होत असते. आणि या रस्त्याची अवस्था महामार्गाचे काम चालू केल्यापासून अतिशय दयनीय झाली होती.

२७ जूनला माळीनगरमध्ये पालखीचे आगमन होणार असल्याने आणि एकूणच रस्त्याची दुरवस्था पाहून उभ्या रिंगणासाठी ‘रस्त्याच्या दैन्यवस्थेमुळे रिंगण सोहळा अडचणीत’ हे वृत्त ‘सकाळ’मध्ये ११ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाले होते.

त्याची दखल प्रशासनाने घेऊन ठेकेदाराला वेगाने काम करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर या उभ्या रिंगण सोहळ्यातील रस्त्याचे काम वेगाने करण्यास सुरवात झाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com