Raigad News: अजित पवार यांच्या रूपाने सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला लोकनेता हरपल्याची भावना काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केली. उरण राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)तर्फे तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर यांच्या वतीने उरण येथील आनंदी हॉटेलमध्ये आज (ता. ४) अजित पवार यांचे अस्थिकलश पूजन व शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ठाकूर हे शोकभावना व्यक्त करताना बोलत होते. अस्थिकलशाचे पूजन करून माणकेश्वर येथील समुद्रात अस्थींचे विसर्जन करण्यात आले..पवार यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे प्रशासनावर त्यांची पकड होती. त्यांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी महाराष्ट्राची हानी झाली आहे, असे ठाकूर यांनी सांगितले. पवार यांच्या विशेष योगदानामुळे ते नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहतील, अशी संतोष ठाकूर यांनी शोकभावना व्यक्त केली. .Ajit Pawar Death: बाजार समित्यांत शुकशुकाट.याप्रसंगी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उपनगराध्यक्ष रवि भोईर, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष समाधान म्हात्रे, वैजनाथ ठाकूर, कुंदा ठाकूर, विजय भोईर, प्रकाश ठाकूर, दीपक ठाकूर, जितेंद्र घरत, प्रकाश ठाकूर, सीमा घरत, ॲड. भार्गव पाटील, मनोज भगत यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..Ajit Pawar Death: राज्यात बाजार समित्या बंद.उणीव भासणारपरीक्षित ठाकूर यांनी पवार यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्यांची काम करण्याची पद्धत आदर्श होती. कोणतेही काम ते लगेच करायचे. त्यांचे कार्य सर्वांना कायम लक्षात राहील. त्यांची उणीव नेहमी भासत राहील..त्यांच्या जाण्याने देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे, अशा भावना ठाकूर यांनी व्यक्त केल्या. तेजस डाकी यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणार नाही. ते एक आदर्श राजकारणी होते, असे मत व्यक्त केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.