Home Fire News : घर जळाल्याने वणीत शेतमजुराचा संसार उघड्यावर

वणी येथील लेंडीपुरा भागातील कल्लू बारकु महाले यांच्या राहात्या घरातून बुधवारी (ता. १९) सांयकाळी सव्वा सहाच्या सुमारास अचानक धूर व आगीच्या ज्वाला येऊ लागल्या.
Fire
FireAgrowon

Nashik News : वणी येथील लेंडीपुरा भागातील कल्लू बारकु महाले यांच्या राहात्या घरातून बुधवारी (ता. १९) सांयकाळी सव्वा सहाच्या सुमारास अचानक धूर व आगीच्या ज्वाला येऊ लागल्या.

परिसरातील तरुणांनी धाव घेत घरातील साहीत्य बाहेर काढण्याचा व आसपासच्या घरातून बादल्यांनी पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. या आगीत अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्य खाक झाल्यामुळे शेतमजुराचा संसार उघडयावर आला.

Fire
Forest Fire: शिकारीसाठी ठाण्यात डोंगरांना आग

या वेळी घटनेची माहिती सरंपच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड यांना कळताच घटनास्थळी दाखल होत ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टँकरला पाचारण केले.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य जगन वाघ, मनोज थोरात, परेश जन्नानी, अजित थोरात, रवी थोरात, बच्चू देशमुख, भूषण चौधरी, गोटू महाले, कौशल्या पवार आदींसह शेकडो तरुणांसह ग्रामपंचायत कर्मचारी राजू कटारीया, सुधाकर महाले, भास्कर कोरडे, सुभाष पवार, वसिम मन्सुरी, कौशल्या पवार, दिनकर गांगोडे, बंडू बोथरा आदींसह जगंदबा ग्रुप, हनुमान सेवा समिती सदस्यांनी तसेच लेंडीपुरा येथील तरुण, कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करून आग विझवली. कल्लू महाले हे मोलमजुरी करून आपले कुटुंब चालवितात. त्यांना मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सरपंच भरसठ यांनी सांगितले.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

आग विद्युत वाहिनीतील शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागली तेव्हा घरात कुणीही नसल्याने जीवितहानी टळली. घर जुन्या पद्धतीचे कौलारू असल्याने व त्यावर प्लॅस्टिकने आच्छादन केले असल्याने आगीने तत्काळ उग्ररूप धारण केल्याने जास्त नुकसान झाले.

पीडित कल्लू बारकू महाले यांची परिस्थिती अत्यंत नाजुक आहे. या आगीच्या घटनेत घरासह सर्वच संपले असून अंगावरचे कपड्यांशिवाय काही राहिले नसल्याने त्यांनी मदतीसाठी उपस्थितांकडे याचना केली.

दरम्यान ग्रामपालिकेतर्फे पीडित परिवारास जवळील अंगणवाडीत तात्पुरती राहाण्याची व खाण्यापिण्याची सोय करण्यात आली असून पुढील काळात भरघोस मदत करून लवकरच त्यांचा संसार उभारण्यास मदत करणार असल्याचे सरपंच मधुकर भरसठ यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com