Yedeshwari Sugar Factory Fraud : ‘येडेश्‍वरी’च्या चेअरमन, कार्यकारी संचालकांवर गुन्हे दाखल करावेत

Yedeshwari Sugar Factory Update : येडेश्‍वरी साखर कारखान्याने फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी न्यायालयात दाखल दाव्याप्रकरणी न्यायदंडाधिकारी जी. एस. पाटील यांनी पांगरी पोलिसांना गुन्हा दाखल करून ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
Yedeshwari Sugar Factory
Yedeshwari Sugar Factory Agrowon

Solapur News : येडेश्‍वरी साखर कारखान्याने फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी न्यायालयात दाखल दाव्याप्रकरणी न्यायदंडाधिकारी जी. एस. पाटील यांनी पांगरी पोलिसांना गुन्हा दाखल करून ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

बाभूळगाव (ता.बार्शी) येथील गळीत हंगामासाठी ऊसतोडी करिता ट्रॅक्टर, ट्रॉली, ऊस तोडीची टोळी, मजूर भाड्याने देऊनही कारखान्याने १० लाख ३० हजार रुपये रक्कम दिली नाही. संतोष रामचंद्र शिंदे यांनी येथील फौजदारी न्यायालयात येडेश्‍वरी साखर कारखाना (खामगाव, ता. बार्शी) कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालकांविरुद्ध खासगी फिर्याद दाखल केली होती.

Yedeshwari Sugar Factory
Vasantdada Sugar Factory : ‘वसाका’ची कोट्यवधींची मालमत्ता धूळ खात

या बाबतची माहिती अशी, की संतोष शिंदे, अजित शिंदे, सूरज शिंदे, विजय शिंदे, विशाल शिंदे, राहुल लोंढे, बाबासाहेब शिंदे, जोतिराम लोंढे, संतोष शिंदे, विष्णू शिंदे, अमित निकम, दत्तात्रेय शिंदे, स्वप्नील शिंदे, धर्मराज साळुंखे अशा सर्वांनी कारखान्यास २०२२-२०२३ गळीत हंगामासाठी ऊस तोडीसाठी ट्रॅक्टर, ट्रॉली व ऊस तोडीची टोळी मजूर भाड्याने दिले होते.

Yedeshwari Sugar Factory
Olam Sugar Factory : ओलम साखर कारखान्याकडून आता मका व तांदळापासून इथेनॉल निर्मिती

कारखान्याने ऊसतोड कामगारांसह प्रत्येक टोळीचे २५००० रुपये भाड्यासह वाहतुकीसाठी दिलेल्या प्रति किलोमीटर प्रति टन दराने वाहतूक खर्च व वाहतूक खर्चावर ४० टक्के कमिशन असे कारखान्यासोबत ठरले होते. पण कारखाना प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांचे झालेले कायदेशीर देणे क्रमप्राप्त असतानाही केवळ वरील शेतकरी व वाहनधारक यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने व रक्कम बुडविण्याच्या उद्देशाने सर्वांची मिळून १० लाख ३० हजार ६०८ रुपये रक्कम दिली नाही आणि फसवणूक केली.

त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी पांगरी पोलिस ठाणे, पोलिस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे रीतसर तक्रार केली. पण तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून संतोष शिंदे यांनी इतर शेतकऱ्यांमार्फत बार्शी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी जी. एस. पाटील यांच्या न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. त्यानंतर वरील आदेश न्यायालयाने दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com