Land Acquisition Issue : भूसंपादनाविरोधात व्यंग्यचित्रांतून आसूड

Farmer Issue : केंद्र सरकारकडून महामार्गांसाठी शेतजमिनींचे जबरदस्तीने होत असलेल्या भूसंपादनाविरोधात व्यंग्यचित्रकार महारूद्र जाधव यांनी मार्मिक व्यंग्यचित्रे काढून सरकारला फटकारले आहे.
Maharudra Jadhav
Maharudra JadhavAgrowon
Published on
Updated on

Pune News : केंद्र सरकारकडून महामार्गांसाठी शेतजमिनींचे जबरदस्तीने होत असलेल्या भूसंपादनाविरोधात व्यंग्यचित्रकार महारूद्र जाधव यांनी मार्मिक व्यंग्यचित्रे काढून सरकारला फटकारले आहे. तर शेतकऱ्यांना भूसंपादन कायद्याची अचूक माहिती दिली आहे. या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन सोमवारी (ता. १४) कामगार सेनेचे सरचिटणीस आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या हस्ते झाले.

सारसबागेच्या जवळील पुणे महानगरपालिकेच्या बाळासाहेब ठाकरे व्यंग्यचित्र कलादालनामध्ये प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन मंगळवार (ता. १५) पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले असणार आहे. या वेळी व्यंग्यचित्रकार महारूद्र जाधव म्हणाले, ‘‘मी शेतकरी असून, माझी देखील जमीन भूसंपादनामध्ये गेली आहे.

Maharudra Jadhav
Land Acquisition : प्रयत्न एकच जमीन दोनदा बळकावण्याचा!

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवेच्या भूसंपादन प्रक्रियेमुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांच्या संघर्षावर प्रकाश टाकण्यासाठी सुरत-चेन्नई एक्स्प्रेस हायवे संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले आहे. शेतकरी कायद्याला घाबरतात, सरकार राजकीय नेते कायद्याची भीती घालून शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत, जमिनींचे संपादन करतात.

Maharudra Jadhav
Land Acquisition : अतिउच्च वाहिनीसाठी भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध

शेतकऱ्यांच्या मूलभूत अधिकारांवर घाला घालतात. मात्र कायद्याच्या भीतीला न घाबरता सनदशीर मार्गाने लढा दिल्यास शेती टिकवू शकतो, याची जनजागृती मी व्यंग्यचित्राच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे.’’

या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या

संपादित जमिनींचा वाजवी मोबदला मिळावा.

भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता आणावी.

शेतकऱ्यांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण व्हावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com