Solapur Development Plan : ‘डीपीसी’तील कामांना मेमध्येच मान्यता

DPC Fund : जिल्हा वार्षिक योजना सन २०२५ - २६ अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला ९३४ कोटी २८ लाखांचा निधी मंजूर आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी एका महिन्याच्या काळात मंजूर निधी अंतर्गत सर्व कामांच्या याद्या जिल्हा नियोजन समितीला सादर कराव्यात.
Solapur DPDC Meeting
Solapur Development Agrowon
Published on
Updated on

Solapur News : जिल्हा वार्षिक योजना सन २०२५ - २६ अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला ९३४ कोटी २८ लाखांचा निधी मंजूर आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी एका महिन्याच्या काळात मंजूर निधी अंतर्गत सर्व कामांच्या याद्या जिल्हा नियोजन समितीला सादर कराव्यात. वेळेत निधी खर्च होण्यासाठी आणि कामांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आता मेमध्येच कामांना अंतिम मान्यता देणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

नियोजन समितीो सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार राजू खरे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पोलीस शहर उपायुक्त दीपाली काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी दयासागर दामा यांच्या सह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना सन २०२४- २०२५ सर्वसाधारण अंतर्गत सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाला अकरा वाहने मिळाली आहेत. त्या वाहनांना पोलीस आयुक्त कार्यालयात हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लोकार्पण केले. महसूल विभागाला मिळालेल्या वाहनांचेही लोकार्पणही नियोजन समिती परिसरात झाले.

औषधाच्या वापराची होणार चौकशी

सन २०२४-२५ मध्ये नियोजन समितीवरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सहा कोटी तर जिल्हा शल्य चिकित्सक यांना सात कोटीचा निधी औषधी खरेदीसाठी उपलब्ध करून दिला होता. संबंधित आरोग्य यंत्रणांनी औषधी खरेदी केल्यानंतर त्याचा वापर योग्य पद्धतीने झाला आहे की नाही? याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधित उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत त्वरित तपासणी करावी असेही त्यांनी निर्देश दिले. प्रत्येक ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी चांगल्या सुविधा आहेत का? व शौचालय आहेत का याची तपासणी करावी असेही त्यांनी सांगितले.

Solapur DPDC Meeting
Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

विमानसेवेची गोड बातमी पुढच्या आठवड्यात

होटगी रोड विमानतळ विमानसेवेसाठी सज्ज झाले आहे. सोलापुरात विमानसेवा सुरू व्हावी यासाठी मी स्वत: पुढच्या आठवड्यात दिल्लीला जाणार आहे. त्यानंतर सोलापूरकरांना गोड बातमी समजेल असा विश्‍वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज व्यक्त केला. सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर नियोजन भवन येथील बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Solapur DPDC Meeting
Pune DPDC Meeting : पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती! १,२९९ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

सोलापूरच्या पाणी पुरवठ्याची समांतर जलवाहिनी सध्या अंतिम टप्प्यात आहे. समांतर जलवाहिनीचे काम वेळेत पूर्ण करण्यासोबतच पाकणी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या अडचणी संदर्भातही आपण लक्ष घातल्याचे त्यांनी सांगितले. पाकणी येथे वनविभागाच्या जागेवर जलशुद्धीकरण उभारण्यासाठी कार्यारंभ आदेश दिला आहे.

वनविभाग या जागेवर काम करू देत नाही, हा प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना मुंबईत बोलविण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्री गोरे यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिस व संबंधित यंत्रणांना सक्त सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील अनधिकृत वाळू तस्करी व वाळू उपसा यामध्ये आपण कोणाचीही हयगय करणार नसल्याचे गोरे यांनी सांगितले.

प्रशासनाला पालकमंत्र्यांच्या सूचना

शासकीय कार्यालयात महिला शौचालयासाठी डीपीसीकडे प्रस्ताव द्यावा

जिल्ह्यातील सर्व शाळांमधील प्रत्येक वर्गात सीसीटीव्हीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. विठ्ठल मंदिर जतन व संवर्धनाची कामे आषाढीपूर्वी पूर्ण करा

मोहोळ तालुक्यातील ११ गावांना तपासणी करून टँकर द्या

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com