
Pune News: देशातील कृषी व्यवस्थेत योग्य पीक बदल (क्रॉप डायव्हर्सिफिकेश) हवा असल्यास पुष्पोत्पादनाला चालना द्यावी लागेल. विशेष म्हणजे पुष्पोत्पादनात गुंतलेले ९० टक्के शेतकरी अल्पभूधारक असूनही धोरणात्मक पाठबळ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
देशाचे पुष्पोत्पादन क्षेत्र उच्च क्षमता असलेले आणि १०० टक्के निर्यातीची क्षमता बाळगणारे आहे. परंतु, यातील ९०.९ टक्के अत्यल्प तर ५.६ टक्के शेतकरी अल्प गटातील आहेत. ३ टक्के शेतकरी मध्यम, तर अवघे ०.१ टक्के शेतकरी मोठ्या गटातील आहेत. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना लागवडीपासून ते निर्यातीपर्यंत विविध टप्प्यांवर मदतीची आवश्यकता आहे, असे पुष्पोद्योगातील घटकांना वाटते.
जगभर फुलांना मागणी वाढत असून फुलशेतीला उपयुक्त ठरणारे समतोल हवामानाचे भूभाग पट्टे विविध राज्यांमध्ये आहेत. पारंपरिक शेतीपेक्षाही अधिक पटीने नफ्याची क्षमता असताना फुलशेतीचा फायदा शेतकऱ्यांना मिळात नसल्याचे दिसून येते.
देशातील फुलशेती कट फ्लॉवर्स, लूज फ्लॉवर्स, ड्राय फ्लॉवर्स, कट ग्रीन, प्लॉट प्लॅंट, फ्लॉवर्स सीड्स, अत्तरे व सुगंधी तेल अशा विविध क्षेत्रांत विभागली गेली आहे. विशेषतः तमिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात पुष्पोत्पादन स्थिरावत आहे. २०२३-२४ मधील झालेल्या अभ्यासानुसार, देशात साडेसात लाख एकरवर फुलशेती केली जाते आहे.
त्यातून २२ लाख ८४ हजार टन सैल फुलांचे (लूज फ्लॉवर्स), तर ९ लाख ४७ हजार टन कापलेल्या फुलांचे (कट फ्लॉवर्स) उत्पादन घेतले जात असल्याचा अंदाज आहे. द्राक्षाप्रमाणे फुलउत्पादकांना निर्यातीसाठी मार्गदर्शन मिळत नाही. प्रतिकूल परिस्थिती असतानाही देशातील फुलनिर्यात १९ हजार ६७८ टनाच्या पुढे पोचली आहे. त्यातून ७१७ कोटी रुपयांपेक्षा परकीय चलन मिळाले आहे. भारतीय फुलांना अमेरिका, हॉलंड, इंग्लंड, कॅनडा आणि मलेशियातून मागणी आहे. लागवडीपासून निर्यातीपर्यंत मार्गदर्शन करणारी साखळी उभारली गेलेली नाही, असे पुष्पोत्पादनातील व्यावसायिकांना वाटते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.