Milk Subsidy : नगर जिल्ह्यात आतापर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांना ८२ कोटी रुपयांचे अनुदान

Milk Producers Farmer : राज्य शासनाने गायीच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केल्यावर ११ जानेवारी ते १० मार्च या पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८२ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
Milk Subsidy
Milk SubsidyAgrowon

Nagar News : राज्य शासनाने गायीच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केल्यावर ११ जानेवारी ते १० मार्च या पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८२ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या योजनेपासून वंचित राहिलेल्या उत्पादकांना १५ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येतील.

नव्याने जाहीर झालेल्या अनुदानास साधारणतः एवढेच दूध उत्पादक पात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुग्धविकास विभागाला नवीन शासकीय निर्णयाची प्रतीक्षा असून त्यानंतर अंमलबजावणी होईल.

Milk Subsidy
Milk Subsidy Scheme : दूध अनुदान योजना केवळ मलमपट्टी ठरण्याची शक्यता

दूध व दुग्धजन्य पदार्थाची मागणी कमी झाल्याने दुधाचे दर घसरले आहेत. सद्यःस्थितीतील गायीचे दूध २० ते ३० रुपये प्रतिलिटर या दराने विक्री होते. राज्याचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे यांनी हा दर गृहित धरून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची विधिमंडळात ५ जुलै रोजी घोषणा केली.

यापूर्वीही दूध उत्पादकांना अनुदान दिले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६७ कोटी १९ लाख ८१ हजार ५५५ रुपयांचे अनुदान दिले. जिल्ह्याबाहेरील काही शेतकरी जिल्ह्यातील दूध शीतकरण केंद्रांवर दूध घालतात. अशा शेतकऱ्यांना १५ कोटी ५९ लाख १७ हजार ८५ रुपयांचे अनुदान दिले आहे. जिल्ह्यात यापूर्वी ७४ प्रकल्पांनी युजर आयडी आणि पासवर्ड दिले होते.

Milk Subsidy
Cow Milk Subsidy : गाय दुधाचे पाच रुपये अनुदान लाभार्थ्यांची संख्या गुलदस्त्यात

ज्या दूध संकलन केंद्र किंवा शीतकरण प्रकल्पावर दहा हजारांपेक्षा जास्त दुधाचे संकलन होते. त्यांनी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, नगर येथे संपर्क साधावा. अन्न-औषधे प्रशासन विभागाचा परवाना, उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र आणि दूध तपासणी करणारे ओळखपत्र आणि मोबाईल क्रमांक द्यावा, शेतकऱ्यांना दुधाचे अनुदान मिळण्यासाठी जनावरांचे भारत पशुधनवर नोंदणी बंधनकारक आहे.

त्यासाठी जनावरांचे इअर टॅगिंग करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांचे इअर टॅगिंग राहिले आहे. त्यांनी जवळच्या पशुवैद्यकीय चिकित्सा केंद्रात जनावरांना घेऊन टॅगिंग करावे असे पशुसंवर्धन विभागाने आवाहन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com