Orange Fruit Fall : संत्रा फळगळीचा ७५ हजार हेक्‍टरला फटका

Orange Fruit News: बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे संत्रा पट्ट्यात फळगळती झाली. यामुळे सुमारे ६५ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील बागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
Orange Fruit
Orange FruitAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे संत्रा पट्ट्यात फळगळती झाली. यामुळे सुमारे ६५ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील बागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. यात सर्वाधिक ६५ हजार हेक्‍टर बाधित क्षेत्र हे एकट्या अमरावती जिल्ह्यातील असून, नागपूर जिल्ह्यात २५ हजारापैकी १० हजार हेक्‍टरचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

संततधार पाऊस, अतिवृष्टी याचा फटका संत्रा बागांना सर्वाधिक बसला. राज्यात सुमारे दीड लाख, तर एकट्या विदर्भात सव्वा लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. त्यापैकी एक लाख हेक्‍टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यात असून, त्यातील उत्पादनक्षम ७० हजार हेक्‍टर इतके आहे. नागपूर जिल्ह्यात २५ हजार हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे.

अमरावती जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून फळगळतीच्या समस्या तीव्र झाली आहे. पाऊस पडून गेल्यावर १५ ते २० किंवा २५ दिवसांनी फळे गळून पडतात. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर पीक सर्व्हेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया करतेवेळी संत्रागळ दिसून येत नाही. परिणामी, हे नुकसान नोंदविणे शक्‍य होत नसल्याने नैसर्गिक आपत्तीची भरपाई अशा शेतकऱ्यांना मिळत नाही.

Orange Fruit
Orange Fruit Drop Survey : संत्रा फळ गळती नुकसानीचे पंचनामे तातडीने करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिनाभरापूर्वी अमरावती दौऱ्यावर असताना फळगळतीच्या सर्व्हेक्षणाचे निर्देश दिले होते. त्याकरिता त्यांनी थेट जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाकडून संयुक्‍त सर्व्हेक्षणावर भर देण्यात आला आहे. त्यानंतर प्रशासनाकडून संयुक्त पंचनामे करण्यात आले त्या आधारे अमरावती जिल्ह्यात संपूर्ण ६५,००० हेक्टर क्षेत्र बाधित म्हणून दाखवण्यात आले आहे.

Orange Fruit
Orange fruit fall : संत्रा पट्ट्यात पसरली मृगाबाबत अनिश्‍चितता

अमरावती जिल्ह्यात पूर्ण क्षेत्र बाधित

जून-जुलैमधील पावसामुळे ४० हेक्‍टरवरील संत्रा बागांमधील फळगळती झाल्याचे यापूर्वीच्या सर्व्हेक्षण व पंचनाम्यात नोंदविण्यात आले आहे. आता उर्वरित २५ हजार हेक्‍टरवरील बागांचे सर्व्हेक्षण करून पंचनाम्याअंती अहवाल शासनास सादर केला जाणार आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण ६५ हजार हेक्‍टर क्षेत्राला भरपाई मिळण्याचे निश्‍चित मानले जात आहे. याउलट नागपूर जिल्ह्यात २५ हजार हेक्‍टरपैकी केवळ दहा हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित दाखविण्यात आले आहे.

जून-जुलैमध्ये चाळीस हजार हेक्टर नुकसान फळगळतीमुळे झाले आहे. त्यानंतर आता सुमारे वीस ते पंचवीस हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यानुसार शासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे.
किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com