Climate Change : शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे दरवर्षी ७० हजार कोटींचा फटका: डाॅ. वार्ष्णेय

Farmers Loss : २०१८ च्या अहवालानुसार देशातील शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणामुळे दरवर्षी जवळपास ७० हजार कोटींचा फटका बसतो.
Climate Change
Climate ChangeAgrowon
Published on
Updated on

Pune News : बदलत्या वातावरणाचा जगाला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. शेती सर्वाधिक प्रभावित होत आहे. २०१८ च्या अहवालानुसार देशातील शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणामुळे दरवर्षी जवळपास ७० हजार कोटींचा फटका बसतो.

त्यामुळे बदलत्या वातावरणात जग धरू शकेल अशे वाण विकसीत करून, आधुनिक शेती पध्दतींचा विकास आणि प्रसार आवश्यक आहे, असे आवाहन आनंद कृषी विद्यापिठाचे माजी कूलगुरू एम. सी. वार्ष्णेय यांनी केले.

Climate Change
Climate Change : हिमनद्यांवर मॉन्सून परिवर्तनशीलतेचा परिणाम

पुणे येथे आयोजित क्लायमेट स्मार्ट आणि डिजिटल शेतीमध्ये माध्यमांची भुमिका या एक दिवसीय कार्यशाळेत डाॅ. वार्ष्णेय बोलत होते. डाॅ. वार्ष्णेय म्हणाले की, देशातील ग्रामिण ५७३ जिल्ह्यांपैकी तब्बल १०९ जिल्ह्यांना बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसत आहे.

म्हणजेच तब्बल १९ टक्के जिल्हे बदलत्या वातावरणाच्या परिणामाच्या `हाय रिस्क` श्रेणीत म्हणजेच जास्त धोक्याच्या पातळीत आहेत. तर २०१ जिल्हे म्हणजेच एकूण ग्रामिण जिल्ह्यांपैकी ३५ टक्के जिल्हे `रिस्क` या श्रेणीत म्हणजेच धोक्याच्या पातळीवर आहेत.

Climate Change
Climate Change : हवामान बदल उभयचरांसाठी जीवघेणा

``सध्या शेतीमध्ये जे काही नुकसान होत आहे. त्यापैकी तब्बल ७७ टक्के नुकसान केवळ बदलत्या वातावरणामुळे जी काही संकटं येत आहेत त्यामुळे होत आहेत. केंद्र सरकारच्या २०१८ च्या आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, बदलत्या वातावरणामुळे देशातील शेतीचे जवळपास ७० हजार कोटींचे दर वर्षाला नुकसान होत आहे. म्हणजेच शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे``, असेही डाॅ. वार्षेय यांनी सांगितले.

बदलत्या वातावरणात शेतकऱ्यांना काय हवे?
- बदलत्या वातावरणामुळे बदललेल्या पीक हंगाम आणि पध्दतीला अनुकूल पीक आणि व्हरायटी
- कमी कालावधीच्या वाणांची विकास
- वाढते तापमान, दुष्काळ, क्षारता आणि काही धोके सहनशील वाणांचा विकास
- किनारी भागातील क्षारता सहनशील वाण
- बदलत्या वातावरणासाठी आवश्यक गुणधर्माचे संशोधन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com